मुंबई : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यात इतरत्र पाऊस होणार असून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर एका जिल्ह्यात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कुठल्या भागांना पावसाचा इशारा…
कुठल्या भागांना पावसाचा इशारा…
मुंबई आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी याच तारखांना मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस कोसळले. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातमध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. पण उद्यापासून मात्र पाऊस ओसरले अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भाला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात ९ तारखेला पावसाचा जोर पहायला मिळेल पण त्यानंतर पुढचे २ दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज आहे. पण यानंतर विदर्भातही पाऊस सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.