कोलंबो : भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने एक खास गोष्ट करत सर्वांची मनं जिंकली आहेत. रोहित शर्माचा एक चाहता आहे. जो सध्याच्या घडीला जास्तच आजारी आहे. या चाहत्यासाठी रोहित शर्माने एक खास गोष्ट केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.भारतीय संघ श्रीलंकेत आशिया कप खेळ आहे. रोहितचे हे फॅन श्रीलंकेचेच आहेत. या चाहत्यांनी रोहितचे सामने मैदानात येऊनही पाहिले आहेत. पण सध्याच्या घडीला ते आजारी आहेत आणि त्यांना मैदानात सामना पाहायला येणे शक्य वाटत नाही. ही गोष्ट रोहितला समजली आणि त्याने एक खास गोष्ट केली.भारताने आशिया चषक स्पर्धेत नेपाळवर विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाला जास्त दिवस विश्रांती मिळाली. यामध्येच रोहितला आपले बुजुर्ग चाहते असलेले पर्सी अंकल यांच्या आजारापणाबाबत समजले. पर्सी अंकल आता आपल्याला मैदानात पाहायला येऊ शकत नाहीत, हे रोहितला समजले. रोहित आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. यावेळीही रोहितने पर्सी अंकल यांना नाराज केले नाही. पर्सी अंकल जरी मैदानात सामना पाहायला येऊ शकणार नसले तरी आपण त्यांना भेटायला जाऊ शकते, हे रोहितच्या मनात आले. त्यामुळे रोहितने थेट पर्सी अंकल यांचे घर गाठले. आपला लाडका खेळाडू आपल्या दारी आल्याचे पाहून पर्सी अंकल यांना आनंद तर झाला, पण यावेळी ते जास्त भावुक झाले होते. रोहित शर्मा फक्त भेटून त्यांना निघाला नाही. तर रोहित त्यांच्याबरोबर बसला आणि बराच काळ त्यांच्याबरोबर संवाद साधला. या सर्व गोष्टीमुळे पर्सी अंकल सुखावले आणि त्यांनी रोहितला शुभेच्छ दिल्या. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माचे चाहते जगभरात आहेत. आपल्या चाहत्यांना रोहित कधीच विसरत नाही आणि त्याचे ताजे उदाहरण यावेळी पाहायला मिळाले आहे. आता रोहित आशिया कपमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.