पुणे : राज्याचे राजकारण दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये रात्रीत झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात लवकरच धमाका होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राजकीय व्यक्ती नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केवळ काही वाक्य लिहून उभारले जाणारे फ्लेक्स कायम चर्चेचा विषय बनतात. यामध्येच एखाद्या नेत्याने अशा पद्धतीने बॅनर्स उभारल्यास काहीतरी राजकीय घडामोड घडणार, हे मात्र नक्की आहे. जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांच्याकडून लावण्यात आलेले फ्लेक्स मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. “२९ सप्टेंबर २०२३ सर्वात मोठी घोषणा होणार” असा मजकूर लिहिण्यात आलेल्या फ्लेक्समुळे जुन्नरच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

एका बाजूला राज्यातील राजकारण अस्थिर बनले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि या गटामध्ये जाण्यावरून विद्यमान आमदार अतुल बेनके यांची असलेली संभ्रमावस्था, यावरून सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. आता शरद सोनवणे हे नवीन काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भारत-पाकिस्तान या फक्त एकाच सामन्यासाठी का आहे राखीव दिवस, जाणून घ्या खरं कारण…
या फ्लेक्समुळे शरद सोनवणे पक्ष बदल करतात का ? की आणखी काही धमाका करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जुन्नरचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तराधिकारी नेमणुकीबाबत विचारला असता अण्णा हजारे आकाशाकडे बोट करून म्हणाले…
दरम्यान, अतुल बेनके यांनी मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्यांचं देखील आयोजन केलेलं आहे. त्यामुळं अतुल बेनकेंची पुढील वाटचाल नेमकी कशी असेल हे स्पष्ट झालेलं नाही. त्याच पार्श्वभूमीवर शरद सोनावणे यांच्या फ्लेक्सनं चर्चांना उधाण आलं आहे. शरद सोनावणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Maratha Protest : अंतरवाली सराटी आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरण हायकोर्टात, कुणी केली फौजदारी जनहित याचिका?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here