पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनागर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना घडली आहे.
गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले, गाडीची वाट बघताना लागला डोळा, जाग येताच घडलं असं काही की उडाली झोप
मिळालेल्या माहितीनुसार, अभय छगन वाईकर (२२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (१९, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार आनंद घोलप यांनी उत्तमनागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अभय वाईकर आणि आविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत.

आम्ही चर्चा करतोय पण मनोज जरांगे पाटलांना पटायलाही हवं ना, आम्ही कमी पडतोय : अजित पवार

वाईकरने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित असताना धनवडे याच्याकडून पिस्तूलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. या घटनेत वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार तपास करीत आहेत. अभय वाईकरने बिहारमधून देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. वाईकरने पिस्तूल का बाळगले? त्याने कोणाकडून पिस्तूल खरेदी केले, याची माहिती घेण्यात येत आहे. पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेल्याने ही घटना घडल्याचे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here