म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशभरात औत्सुक्याचा विषय ठरलेले अयोध्येचे श्रीराम मंदिर, शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५०वी वर्षपूर्ती, चांद्रयानाची यशस्वी मोहीम यंदा गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये बघायला मिळणार आहे. मध्यवर्ती भागातील प्रमुख मंडळांसह उपनगरांमधील मंडळांमध्ये देखाव्याची जोरदार तयारी करीत असून, यंदा श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीबरोबरच गड-किल्लेही साकारण्यात येत आहेत.

गणेशोत्सवात सर्वांसाठी आकर्षण ठरणाऱ्या मंडळांच्या देखाव्यांच्या कामांनी वेग घेतला आहे. प्रतिकृती उभारणाऱ्या मंडळांच्या कारागिरांकडून मंदिरांमधील बारकावे साकारण्यावर कारागीर भर देत आहेत. दर वर्षी गणेशोत्सवात सामाजिक प्रश्नांवर भाष्य, इतिहासातील विविध घटना, राजकीय परिस्थिती, पौराणिक गोष्टी, देशभरातील मंदिरे भाविकांना पाहायला मिळतात. शहरातील विविध मंडळांकडून यंदा राम मंदिराच्या प्रतिकृती उभारण्यात येत आहेत. याच बरोबरीने यंदा शहरात उज्जैनमधील महांकाल मंदिर, काशीतील विश्वनाथ मंदिरासह दक्षिणेकडील विविध मंदिराच्या प्रतिकृती उभारण्यात येत आहेत. काही मंडळांकडून मंदिराची प्रवेशद्वारे साकारण्यात येत आहेत.

गणेश भक्तांच्या पंढरीत उत्साह, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा दिमाखात

यंदा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्षे आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम उलगडणारे देखावेही यंदा साकारण्यात येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांमधील योद्ध्यांची कामगिरी देखाव्यात पाहता येणार आहे. पुराणकथा, मागील काही महिन्यांतील राज्यातील घडामोडींचे प्रतिबिंबही देखाव्यात असल्याचे कलाकार सांगतात.

विसर्जन मिरवणुकीत फुलांची सजावट असणाऱ्या रथांमधून गणरायांची मिरवणूक काढण्यात येते. यंदा रथांवर राम मंदिरासह पुराणकथांतील प्रसंग साकारण्याचे नियोजन आहे.

– सुभाष सरपाले, सजावटकार

यंदा विविध मंडळांचा मंदिराच्या भव्य प्रतिकृती साकारण्याकडे कल आहे. यासह शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष असल्याने त्या संदर्भातील देखावे उभारले जात आहेत. फायबर आणि लोखंडाचा वापर करत या प्रतिकृती उभारण्यात येत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगाने तयारी सुरू आहे.

– अमन विधाते, कला दिग्दर्शक


प्रतिकृतीसाठी बारकाव्यांचा अभ्यास

मंदिरे, चांद्रयानासाठी विविध गोष्टींच्या प्रतिकृती करण्यासाठी देखावे साकारणाऱ्या कलाकारांकडून डिझाईोनचा ‘३ डी’ द्वारे सराव करण्यात येत असून, अधिक बारकावे दिसण्यासाठी कलाकुसरीने काम त्यांना हाती घेतले आहे.

G20 Summit: दिल्लीतील गरीब व प्राणी दिसू नयेत याचा खटाटोप; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here