ही शौचालये सशुल्क असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती पालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिलांसाठी शौचालये बांधताना त्यांचा तळ जमिनीपासून फार उंच असणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. विजेची बचत करण्यासाठी दोन किलो वॉटचे सौरऊर्जा पॅनल शौचालयांवर बसवण्यात येणार आहेत. ही शौचालये खासगी संस्थेस चालविण्यास देण्यात येणार आहेत. शौचालयांना जलजोडण्या देणे शक्य होणार नसल्याने प्रत्येक शौचालयात एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. पाणी उपलब्ध करणे संबंधित संस्थेस बंधनकारक असणार आहे.
या ठिकाणी शौचालये
गिरगाव २
दादर २
वर्सोवा ४
जुहू ८
अक्सा ४
गोराई ४