पेट्रोलियम कंपन्यांनी मागील पाच दिवसांत तीनवेळा केली आहे. यामुळे डिझेल प्रती लीटर ४० पैशांनी स्वस्त झाले आहे. कंपन्यांनी टाळेबंदीत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यानंतर सहा महिन्यांत पहिल्यांदाच कंपन्यांनी गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी डिझेल दरात १६
पैशांची कपात केली होती. पुन्हा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी डिझेल १३ पैशांनी स्वस्त केले होते. आज पुन्हा सोमवारी कंपन्यांनी डिझेलच्या किमती ११ पैशांनी कमी केल्या आहेत. या दरम्यान पेट्रोल दर मात्र स्थिर ठेवले आहेत.
आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.७३ रुपये कायम आहे. डिझेलचा भाव ७९.६९ रुपये झाला आहे. त्याआधी तो ७९.८० रुपयांवर होता. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८२.०८ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.१६ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.०४ रुपये असून डिझेल ७८.४८ रुपये झाला आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.५७ रुपये आहे. डिझेल ७६.६६ रुपये प्रती लीटर झाला आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असून देखील मागील तीन आठवडे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरवाढीचा सपाटा लावला होता. इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार १६ ऑगस्टपासून १६ दिवसांमध्ये चार दिवस पेट्रोलचा भाव स्थिर होता. तर उर्वरित १२ दिवसांत पेट्रोल १.६० रुपयांनी महागले होते.
सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात मोठी कपात केल्याने सोमवारी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भाव १ डॉलरने कमी झाला. ब्रेंट क्रूड ९१ सेंट्सने कमी होऊन प्रती बॅरल ४१.७५ डॉलर झाला.अमेरिकेतील वेगाने कमी होणारा कच्च्या तेलाचा साठा, अमेरिकेतील आकडेवारी यांचा समावेश आहे. कमकुवत अमेरिकी डॉलरने कच्च्या तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला.
करोना व्हायरस रोखण्यासाठी देशात जवळपास अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. याची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला चुकवावी लागली आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ नव्हे तर अधोगती झाली आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) उणे २३.९ टक्के इतका प्रचंड खाली घसरला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये अमेरिका आणि चीनच्या निर्मिती प्रक्रियेत सुधारणा झाल्याने मागणीच्या शक्यतांना आधार मिळाला. चीनच्या कॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सने वाढत्या निर्यातीसह कारखान्यातील कामकाजात वृद्धीचे संकेत दिले. ओपेक आणि सहकाऱ्यांनी ऑगस्ट २०२० नंतर दैनंदिन उत्पादन कपात ९.७ दशलक्ष बॅरलवरून ७.७ दशलक्ष बॅरलवर करण्याचा निर्णय घेतला. मात्र जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात अनिश्चित मागणीमुळे तेलाचा नफा मर्यादित राहिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times