म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सरपंचा विरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी गावाच्या उपसरपंचाला काही जणांनी घरासमोरून अपहरण करून नेल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नवनाथ विठ्ठल चव्हाण (वय३२,रा. शिवूर शिवार शेत गट क्रमांक ४२)यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील विठ्ठल चव्हाण हे गावाचे उपसरपंच आहेत. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या दरम्यान रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान नवनाथ भावड्या असे वडील विठ्ठल चव्हाण यांचा आवाज आला. नवनाथ हे घराबाहेर येण्याचा प्रयत्न करित असताना, त्यांच्या घराच्या दरवाज्याला कडी बाहेरून लावून घेतली होती. या दरवाज्याच्या फटीतून नवनाथ यांनी बघितले असता, त्यांच्या वडीलांना तोंड बांधलेले काही लोक हे ओढून नेत होते. यानंतर नवनाथ याने त्यांचा भावाला फोन करून बोलविले आणि ते घरातून बाहेर पडले. त्यांनी जागेची पाहणी केली असताना, त्याच्या वडीलांचा मोबाईल पडलेला होता. यानंतर वडिलांचा शोध घेतला. नवनाथ चव्हाण यांच्यासोबत बाळासाहेब जगधने, अप्पासाहेब आहेर, मनोज पठारे यांच्यासोबत जाऊन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.

मावळात ७० वर्षीय महिलेच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार

नवनाथ चव्हाण याने दिलेल्या तक्रारीत गावाच्या सरपंच मनिषा आहेर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पास होऊ नये. यासाठी शिवाजी आहेर, सोपान शिवाजी आहेर, यांच्यासह चार ते पाच जणांनी वडीलांना पळुन नेले.

इथे ओशाळली माणुसकी! महिलेला प्रसूती कळा सुरू; पोलिसांनी रुग्णालयात नेले, डॉक्टरांचा उपचारास नकार, अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here