म.टा. प्रतिनिधी, मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात येत्या गुरुवारपासून (१४ सप्टेंबर) सुनावणी सुरू होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली असून शिंदे यांच्या पक्षाच्या ४० आमदारांना, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.

आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तिवादही करावा लागेल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आता याप्रकरणी १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाने अलिकडेच विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीवर तब्बल ६ हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले होते.

G20 Summit: पंतप्रधान मोदींकडून G20 परिषदेत ‘भारत’ नावाचा आवर्जून वापर, खरंच देशाचं नाव बदलणार?
एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी तब्बल सहा हजार पानी उत्तर पाठवले असून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कारवाईला आता वेग आला आहे. शिवसेनेच्या उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या उत्तरात कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्हीच शिवसेना हे पटवून देण्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा प्रयत्न आहे.

मराठा आंदोलक आक्रमक, काळ्या फिती लावून अशोक चव्हाण यांनाच घेराव घातला, पुढे काय घडलं?
शिंदे गटाकडून या लेखी उत्तरात काही पुरावे सादर करण्यात आले आहेत. उर्वरित पुरावे प्रत्यक्ष सुनावणीवेळी सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचाच पक्ष योग्य असून आम्ही उत्तर दिले आहे. त्यावर आम्हाला समक्ष युक्तिवाद करायलाही आवडेल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ‘राष्ट्रवादीचा एक गट म्हणजेच अजित पवार आमच्यासोबत आहेत. त्यांनी उघड भूमिका घेतली आहे.

अपात्रता टाळण्यासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांना भाजपमध्ये जावं लागेल एकनाथ खडसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here