नवी दिल्ली : भारतासाठी हा पाकिस्तानचा सामना महत्वाचा असेल. गेल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असता, असे म्हटले जात आहे. पण जर भारताला या सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवायचा असेल, तर त्यांना फक्त एकच गोष्ट करावी लागेल.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताला सावरले होते ते हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांनी. या सामन्यात भारताची सुरुवात वाईट झाली होती. शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शहा यांनी भारताचे कंबरडे मोडले होते. या सामन्यात भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. कारण त्यांची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्या पाच षटकांमध्येच भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही अनुभवी खेळाडूंना गमावले होते. त्यानंतर शुभमन गिलही क्लीन बोल्ड झाला होता आणि श्रेयस अय्यर पुनरागमन करत असताना जास्त चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला लगाम बसला होता. पण भारताला जर या सुपर ४ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर भारताने पहिली ५ षटकं एकही विकेट न गमावता खेळायला हवे. कारण जर पाच षटकांमध्ये भारताने एकही विकेट गमावली नाही तर त्यांना धावसंख्येचा चांगला पाया बनवता येऊ शकतो. गेल्या सामन्यात रोहित आणि कोहली लवकर बाद झाले होते. पण या सामन्यात जर हे दोघे जास्त काळ पीचवर राहिले, तर त्याचा नक्कीच फायदा भारताला होऊ शकतो. या पाच षटकांमध्ये भारताने विकेट गमावली नाही तर स्थिरस्थावर झालेले दोन्ही सलामीवीर मोठी खेळी साकारू शकतात. त्यामुळे भारताने फक्त पहिली पाच षटके खेळून काढली तर त्यांना विजय मिळवता येऊ शकतो. त्यामुळे आता या सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर कशी कामगिरी करतात, यावर भारताचा विजय अवलंबून असेल. त्यामुळे आता पहिल्या पाच षटकांमध्ये पाकिस्तान भारताला किती धक्के देते आणि दुसरीकडे भारत या पाच षटकांचा कसा सामना करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. या भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी खास राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे हा सामना पाऊस पडला तरी दुसऱ्या दिवशी होऊ शकतो. त्यामुळे आता या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे या सामन्यातील विजेत्याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here