मोरोक्को: आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत, मोरक्कन सरकारने २००० हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विध्वंसात हजारो लोक जखमी झाले आहेत. ज्या भागात भूकंपांचे हादरे बसले त्या भागातील प्रत्येक इमारत कोसळली आहे. यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. लोक आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. तर आपत्कालीन पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत.

भूकंप येण्याच्या काही सेकंदापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे एक सीसीटीव्ही फुटेज आहे. हा व्हिडिओ भूकंपाच्या आपत्तीच्या काही सेकंद आधीचा असल्याची माहिती आहे.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
मोरोक्को येथे शुक्रवारी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्यामध्ये आतापर्यंत दोन हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, दोन लोक एका बाकावर बसलेले दिसत आहेत.

पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध असलेल्या देशातील माराकेश शहरात हा मोठा भूकंप झाला. काही वेळाने व्हिडिओमधील लोक इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक धुळीचे लोट उठतात आणि इमारत कोसळल्याचं दिसतं. सध्या बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. किमान २०१२ लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर २०५९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १४०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पृथ्वीसारखा दुसरा ग्रह सापडला? आपल्याच सूर्यमालेत आहे हा ग्रह, शास्त्रज्ञांचा दावा
भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या अल-हॉज प्रांतात १,२९३ मृत्यूची नोंद झाली आहे. तरौदंत प्रांतात ४५२ मृत्यू झाले आहेत. हे दोन सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आहेत. उत्तर आफ्रिकन प्रदेशात हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. एवढा मोठा भूकंप १२० वर्षांनंतर झाल्याचं एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here