नवी दिल्ली: भारताच्या अध्यक्षतेखाली जी२०चं शिखर संमेलन नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलं आहे. यासाठी जगातील महत्त्वाच्या देशांचे प्रमुख राजधानीत आले आहेत. आज संमेलनाचा दुसरा दिवस आहे. जी२० परिषदेला आलेल्या पाहुण्यांच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युल मॅक्रॉ यांचा समावेश आहे. पण यामध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा इटलीच्या पंतप्रधान यांची सुरू आहे. जॉर्जिया यांना भारताबद्दल विशेष जिव्हाळा, ममत्त्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचं विशेष कौतुक सुरू आहे.सोशल मीडियावर जॉर्जिया यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत. एका व्हिडीओत त्या मोदींचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सर्वाधिक शेअर झाला आहे. ‘आमचं सरकार भारतासोबतचे संबंध दृढ करेल. आम्ही सोबत येऊन बऱ्याच गोष्टी करू शकतो याबद्दल मला विश्वास वाटतो. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. मी त्यांची बरोबरी करु शकत नाही,’ असं मेलोनी त्या व्हिडीओत म्हणत आहेत.जॉर्जिया मेलोनी दिसायला देखण्या आहेत. मात्र त्यांची लोकप्रियतादेखील अफाट आहे. इटलीच्या पंतप्रधान असलेल्या मेलोनी अतिशय कमी वयात राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांचे विचार, विधानं सातत्यानं हेडलाईनमध्ये असतात. त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. ब्रदर्स ऑफ पक्षाच्या नेत्या असलेल्या मेलोनी यांनी गेल्या वर्षी निवडणूक जिंकून इतिहास रचला. एलजीबीटी, मुस्लिम विरोधक असल्याचे आरोप मेलोनी यांच्यावर होत असतात. फॅसिस्ट विचारसरणीच्या राज्यकर्त्या असल्याचे आरोपही त्यांच्यावर होतात. मात्र त्यांनी नेहमीच हे आरोप फेटाळले आहेत. सध्या त्या प्रतिमा संवर्धनावर काम करत आहेत. पुतीन यांना भेटायला माझ्याकडे वेळ नाही असं म्हणणाऱ्या मेलोनी यांनी नाटोला पाठिंबा दिला आहे. त्या रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची बाजू लावून धरतात. मात्र सत्तेतील त्यांच्या मित्रपक्षांचे रशियाशी गहिरे संबंध आहेत.मेलोनी यांनी एलजीबीटींच्या अधिकारांविरोधात अभियान हाती घेतलं होतं. त्यांनी मुस्लिमांबद्दल केलेली विधानंदेखील वादग्रस्त ठरली आहेत. आपण फॅसिस्ट विचारसरणीच्या नसल्याचं त्या अनेकदा सांगातत. मात्र त्याचवेळी त्या स्वत:चा उल्लेख मुसलोनीच्या वारसदार म्हणूनही करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here