वॉशिंग्टन: सुप्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे करोनाच्या संसर्गाने अमेरिकेत निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. आचार्य अत्रे यांच्या त्या कन्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची करोनासोबतची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आज पहाटे त्यांचे ऑगस्टा जॉर्जियातील रुग्णालयात निधन झाले. करोनाची बाधा होण्याआधी त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र, करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली. मीना देशपांडे यांच्या निधनामुळे आचार्य अत्रे यांच्याशी निगडीत असलेला दुवा निखळला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मीना देशपांडे यांची साहित्य संपदा:

> आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)

> आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८)

> पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

> मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)

> मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)

> ये तारुण्या ये (कथासंग्रह)

> हुतात्मा (कादंबरी)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here