भोपाळ: सरकारी रुग्णालयातील दोन महिला डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली. दोघींनी एकमेकीना यथेच्छ शिवीगाळ केली. मारहाणीत एका डॉक्टराच्या नाकाला इजा झाली. दोन्ही डॉक्टरांनी एकमेकींवर आरोप केले आहेत. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषव गुप्तांनी दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. जिल्हा पंचायतीचे सीईओ हिमांशु प्रजापती यांना संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटना मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात घडली आहे.स्त्री रोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. पुष्पा पवैया आणि साधना वर्मा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वाद वाढला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी डॉ. पुष्पा यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘सिव्हिल सर्जन असलेल्या डॉ. एम. पी. शर्मांनी डॉ. साधना वर्मांची नेमणूक एचओडी म्हणून केली. तेव्हापासून त्या मला त्रास देत आहेत. माझ्या ड्युट्या उलटसुलट लावल्या जातात. नियमानुसार साधना वर्मांची ड्युटी होती. पण तिथे मला ड्युटी दिली गेली. एसओडींनी मला एका रुग्णाची तपासणी करण्यास सांगितलं. त्याबद्दल बोलण्यासाठी मी साधना यांच्या केबिनमध्ये गेले होते. मी शांतपणे बोलत होते. पण साधना यांनी मला मारहाण केली,’ असा आरोप पुष्पा यांनी केली.डॉ. साधना तुम्ही मला का त्रास देत आहात, असा प्रश्न मी त्यांना विचारल्याचं पुष्पा यांनी सांगितलं. ‘त्यावेळी साधना यांच्या केबिनमध्ये महिला रुग्ण होती. त्यांनी तिला बाहेर जाण्यास सांगितलं. मग मला बेडवर आपटून मारलं. चपलांनी मारहाण सुरू केली. त्यामुळे माझा चश्मा मोडला. नाकाला दुखापत झाली. रक्तस्राव सुरू झाला. साधना एचओडी झाल्यापासून मला त्रास देत आहेत. त्या भ्रष्ट आहेत. रात्री शस्त्रक्रिया करतात. रुग्णांकडून खुलेआम पैसे घेतात. सर्वांना याची कल्पना आहे. पण कोणतीही कारवाई होत नाही,’ असा तक्रारींचा पाढा डॉ. पुष्पा यांनी वाचला. त्यांची डॉ. साधना यांच्या कामातील अनेक त्रुटी सांगितल्या.डॉ. साधना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘माझ्याकडे आलेली रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये झोपली होती. तिच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. डॉ. पुष्पा तिथे आल्या. त्यांनी शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. माझ्या प्रमोशननंतर हे सगळं सुरू झालं आहे. माझं प्रमोशन होणारच होतं. पण ते डॉ. पुष्पा सहन झालं नाही. तेच सगळ्याचं मूळ आहे,’ अशा शब्दांत डॉ. साधना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.
Home Maharashtra ओटी, ड्युटी अन् त्रुटी… दोन डॉक्टर हॉस्पिटलात भिडल्या; बेडवर पाडून चपलेनं मारलं,...