मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन यांनी लक्झरी हॉटेल क्षेत्रात व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. लक्झरी हॉटेल क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या आणि रिसॉर्टसोबत रिलायन्स उद्योग समूहानं महत्त्वाचा करार केला आहे. रिलायन्स आणि ओबेरॉय यापुढे टाटांच्या नेतृ्त्त्वाखालील ताज हॉटेल्स आणि द लीला पॅलेस हॉटेल्सना कडवी टक्कर देताना दिसतील. रिलायन्सनं ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्टसोबत केलेला करार २ हजार ७८३ कोटी रुपयांचा आहे. ओबेरॉय यांच्या ईआयएच लिमिटेडचा १९ टक्के हिस्सा आधीपासूनच रिलायन्सकडे आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्सशी करार केल्यानंतर आता ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्टकडे तीन महत्त्वाच्या मालमत्तांची जबाबदारी देण्यात येईल. या तिन्ही मालमत्ता रिलायन्सच्या मालकीच्या आहेत.दोन कंपन्यांनी केलेल्या घोषणेनुसार, ओबेरॉय हॉटेलकडे रिलायन्सच्या मुंबईतील अनंत विलास हॉटेल, यूकेमधील स्टोक पार्क आणि गुजरातमधील रिसॉर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असेल. अनंत विलास हॉटेल मुंबईच्या बीकेसीत आकारास येत आहे. तर यूकेतील स्टोक पार्कमध्ये ५९ खोल्या आहेत. अंबानींनी २०२१ मध्ये ५२९ कोटी रुपये मोजून ही मालमत्ता ताब्यात घेतली. रिलायन्सच्या ताब्यात असलेल्या हॉटेल्सचं अधिकाधिक व्यावसायिकीकरण करुन त्यात जास्तीतजास्त सुविधा देण्याच्या हेतूनं ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्ससोबत करार करण्यात आला आहे. ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सकडे असलेल्या मालमत्तांचं बाजारमूल्य २ हजार ७८५ कोटी रुपयांच्या घरात आहे. नव्या भागीदारासोबत टाटांच्या ताजला टक्कर देण्याची तयारी रिलायन्सनं सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here