रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण, महामार्गाच्या कामाबद्दल आनंदी आनंद असला तरीही या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ आठ मिनिटात यशस्वी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे उद्या सोमवारी सकाळी ११ सप्टेंबर पासून या बोगद्यातून हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. अवघड वळणांचा कशेडी घाटाला पर्याय असलेल्या या बोगदातून वाहतुकीची गेल्या कित्येक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई कडून गोव्याच्या दिशेने जाताना या बोगद्यातील एक लेन ११ सप्टेंबर पासून सुरू केली जाणार आहे. या बोगदाचे प्रवेशद्वार हे तिरंग्याने रंगवण्यात आल आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला रत्नागिरी आणि रायगड पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आठवडाभरापूर्वी घेतलेल्या बैठकीत योग्य ते निर्देश महामार्ग प्रशासनाला दिले आहेत.

कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा चाळीस मिनिटांचा वेळ आता केवळ आठ ते दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे.

बोगद्यातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून बोगद्यामध्ये लाईट बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आल आहे. रस्त्यावरही ‘कॅट आय’ बसवण्याचे कामही पूर्ण करण्यात आलं आहे. बोगद्यामध्ये प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर आपत्कालीन प्रसंगात वाहन बाजूला घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोगद्याचे काम रिलायन्स आणि शिंदे कंपनी करत आहे. या सगळ्या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून लक्ष ठेवले जात आहे.

परत जाताना घाट मार्ग टाळायला हा पर्याय वाचा

कोकणातून पुन्हा मुंबईकडे जाताना कशेडी घाट टाळायचा असल्यास चाकरमान्यांना रत्नागिरीतून राई भातगाव मार्गे शृंगारतळी येथून धोपावे दाभोळ येथील फेरीबोट मार्गे दापोलीला जाता येईल. दापोली येथून लाटवण महाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावरून पुढे प्रवास करता येऊ शकतो. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास परतीच्या प्रवासातही कशेडी घाट टाळता येऊ शकतो.
रोहित शर्माच्या ५० नंतर मुंबई इंडियन्सची पोस्ट व्हायरल, म्हणाले वनडे क्रिकेटमध्ये…

अत्याधुनिक बुमर तंत्रज्ञानाचा वापर

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्दपासून काही अंतरावर भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बाजूचे तर खेड तालुक्यातील कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगराच्या आतून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. कशेडी घाटाच्या खालील बाजूस बोगद्याची खोदाई अत्याधुनिक बुमर तंत्र वापरून करण्यात आली आहे. बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे.भोगावे, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.
पावसानंतर पाकिस्तान विजयासाठी २४ षटकांत किती धावांचे असेल आव्हान, जाणून घ्या समीकरण…
या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला असून ३५० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी करण्यात आला आहे दोन भुयारी मार्ग आहेत. यातील कोकणाकडे जाणारी एक मार्गिका सुरू होणार आहे. नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्यात असणार आहे.
Ajit Pawar: कोल्हापूरच्या सभेपूर्वी अजित पवारांची मोठी घोषणा,कार्यकर्त्यांना आदेश, सांगलीत काय म्हणाले?

११ लाखाची नांगरणी स्पर्धा, जिथे नरज जाईल तिथे शेतकरी; पालकमंत्री उदय सामंतांनी लावली उपस्थिती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here