म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्व मराठा संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गाने बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केला आहे. तर या बंदच्या आडून शहरात कायदा-सुव्यस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे शांततेत बंद यशस्वी केला जाईल, असे प्रतिपादन समन्वयकांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाचे आरक्षणाकरिता आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला होता. त्याच पद्धतीने शांततेत सोमवारी ठाणे बंदचा निर्णय सकल मराठा मोर्चाने घेतला. हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी करताच दोन दिवसांपूर्वी प्रमुख सर्वपक्षीय नेते व मराठा संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला.

निषेधाच्या घोषणा, घेराव घातला, अशोक चव्हाणांविरोधात मराठा समाज आक्रमक

ठाणे पालिका क्षेत्रात हा बंद केला जाणार असून कोणत्याही स्वरूपात बंद काळात हिंसा केली जाणार नसून नागरिकांनाही सनदशीर मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली जाणार असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले. परिस्थितीनुसार निर्णय सरकारी व खासगी कार्यालय सुरू असल्याने नोकरदारांना सेवा देण्यासाठी ठाणे परिवहन सेवा सुरू ठेवली जाणार आहे. सकाळी बंदची तीव्रता पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. तर रिक्षा संघटनांनी बंदमध्ये थेट सहभागी होणे टाळले असून परिस्थितीप्रमाणे रिक्षाचालक निर्णय घेतील, असे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अशोक चव्हाणांना आंदोलकांचा घेराव इतरांना धसका, भाजपच्या नेत्यांचे मराठवाड्यातील कार्यक्रम लांबणीवर, कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here