म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘ओबीसींसह अन्य समाजघटकांचे सध्याचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे. त्यात वेगळ्या जातीचा समावेश करण्याची आवश्यकता नाही. तथापि, मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्यांवरून वाढवून ती ६६ टक्यांपर्यंत वाढविण्यात आली, तर सध्या निर्माण झालेले सर्वच प्रश्न सुटू शकतात,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुंबईत मांडले. ‘तमिळनाडूमध्ये आरक्षण ७४ टक्क्यांवर गेले असून, तेथील आरक्षण न्यायालयातही टिकले आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी टोकाचे आंदोलन न करता, आरक्षणात १६ टक्यांची अधिक वाढ करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकालात काढावा. मराठा समाजातील गरजू, गरीब घटकांना आरक्षणाच्या माध्यमातून जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा,’ अशी मागणी पवार यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय केंद्रातील विद्यमान सरकारने कायदा करून बदलले आहेत. केंद्र सरकारकडे तो पर्यायसुद्धा उपलब्ध असल्याचे पवार म्हणाले. मात्र काही लोकांना हा प्रश्न सोडवायचा नसून, या प्रश्नांचे घोंगडे त्यांना भिजत ठेवायचे आहे. मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्काचे आरक्षण मिळायला हवे असे काहींना वाटते का, हेसुद्धा तपासून पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

‘ठाणे बंद’ची आज हाक; सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याची भूमिका

मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मुंबईतून फोन गेले होते, त्यानुसार कारवाई झाली, असा आरोप करून, ही कारवाई केली म्हणून आपण शिक्षाही भोगली हे त्यांनी आपल्याला सांगितल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. यामागे जाणीवपूर्वक कारस्थान असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. ‘पक्ष आणि चिन्हाची चिंता करू नका. आपण लोकांमध्ये राहायला हवे. आपण लोकांमध्ये राहिलो तर पक्ष आणि चिन्हाची गरज नसते. मी स्वत: सहा निवडणूका वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आणि जिंकलोसुद्धा,’ असा अनुभव सांगून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी अखेर तो निर्णायक घाव घातलाच; सरकारची चिंता वाढली, नेमकं काय घडलं?

कुळवाडीभूषणवरून वाद नको…

मराठा समाजास आरक्षण देताना गरिबाच्या ताटातील भाकरी काढण्याची गरजच नाही. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला होता. कुळवाडीभूषण असा त्यांनी महाराजांचा उल्लेख केला होता. इतकी वर्षे लोकांनी हे विशेषण स्वीकारले. आज यावरून कशाला वाद करायचा, असेही पवार म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषण थांबवलं पाहिजे; असं पृथ्वीराज चव्हाण का म्हणाले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here