म. टा. खास प्रतिनिधी मुंबई: कामाठीपुरा येथे शरीरविक्रय करणारी महिला एका मद्यपीच्या नजरेत भरली. सोमवारी तो तिच्याकडे गेला, मात्र तिने धुडकावून लावले. डोक्यात राग गेल्याने त्याने थेट पोलिसांनाच फोन केला आणि बॉम्ब असल्याची माहिती देत तिच्या घरचा पत्ता देऊन टाकला. तर दुसऱ्या घटनेत नेपियन्सी रोडवर वास्तव्यास असलेल्या मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेने स्वतःच्याच घरामध्ये बॉम्ब असल्याचे सांगून मदतीसाठी याचना केली. दोन्ही फोनवर मिळालेली माहिती अफवाच ठरली, मात्र यामुळे पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली.

मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ल्याची खोटी माहिती देणाऱ्या फोनची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोमवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने कामाठीपुरा येथील एका गल्लीतील खोलीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस नियंत्रण कक्षातून याबाबत स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कामाठीपुराची संपूर्ण गल्ली पिंजून काढली. मात्र संशयास्पद असे काहीच आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून फोन करणाऱ्या दिलीप राऊत या तरुणाला शोधून काढले. दिलीपला येथील एक तरुणी आवडली मात्र तिने दिलीपला धुडकावून लावले. दारूच्या नशेत असलेल्या दिलीपने तिला धडा शिकविण्यासाठी तिच्या खोलीत बॉम्ब असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.

मदतीसाठी फोन

पोलिसांना दुसरा फोन नेपियन्सी रोड येथून आला. एका ४२ वर्षीय महिलेने स्वतःच्या घरामध्ये बॉम्ब असल्याचे सांगत मला लवकरात लवकर बाहेर काढा, असे पोलिसांना फोन करून सांगितले. नियंत्रण कक्षातून याबाबत मलबार हिल पोलिसांना कळविले. पोलिस तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी तिचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे आढळले. तिने गेल्या काही दिवसांत ३०पेक्षा जास्त वेळा पोलिसांना खोट्या माहितीचे फोन केल्याचे तपासातून समोर आले आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here