अहवालानुसार ईडीने जुलै २०२३ मध्ये सेबीसोबत त्यांच्या तपासातील काही निष्कर्ष सामायिक केले होते. या सर्व कंपन्या व्यवसाय करत असताना गुंतवणूकदार, कंपन्या किंवा परदेशी गुंतवणूकदारांवर फारच कमी किंवा शून्य आयकर आकारला जातो अशा देशांतून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. अहवालानुसार या कंपन्यांनी हजारो कोटी रुपये कमवून परदेशात बसलेल्या ‘बड्या लोकांना’ फायदा करून दिला आहे.
शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?
जेव्हा एखादा सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तेव्हा शेअरची किंमत वाढल्याने त्याला नफा मिळतो. पण शॉर्ट सेलिंग अगदी उलट आहे. जेव्हा कंपनीचे शेअर्स तोट्यात जातात तेव्हा शॉर्ट सेलिंगमध्ये नफा होतो. सोप्या शब्दात समजायचे तर एखाद्या कंपनीचे शेअर्स येत्या काळात पडू शकतात हे जर एखाद्या गुंतवणूकदाराला माहीत असेल तर तो त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊ शकतो आणि ते पडल्यावर विकू शकतो. यालाच शॉर्ट सेलिंग म्हणतात.
हिंडेनबर्ग देखील अशाच प्रकारे कमाई करतो. उदाहरणार्थ जर एखाद्या लहान विक्रेत्याला ५०० रुपयांचा स्टॉक ३०० रुपयांच्या पातळीवर येण्याची अपेक्षा असेल, तर तो मार्जिन अकाउंट वापरून ब्रोकरकडून स्टॉक उधार घेऊ शकतो आणि सेटलमेंट कालावधीपूर्वी तोच स्टॉक परत खरेदी करू शकतो.
हिंडेनबर्ग अहवालापूर्वीच पोझिशनिंग
मीडिया अहवालानुसार २४ जानेवारी रोजी जेव्हा हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा या १२ कंपन्यांनी आधीच पोझिशन घेतली होती. शॉर्ट सेलिंगमध्ये पोझिशन घेणे म्हणजे शेअर्स विक्री करणे. अहवालानुसार जुलै २०२० मध्ये एक कंपनी अधिकृतपणे सुरू करण्यात आली. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही कंपनी कोणताही व्यवसाय करत नव्हती आणि सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ या अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीची उलाढाल ३१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली, ज्यातून कंपनीने १,१०० कोटी रुपयांची कमाई केली.