नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक ४ च्या टप्प्यापर्यंत भारतात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान करोना काळात आपापल्या गावी गेलेला कामगार हळूहळू शहराकडे निघालाय. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेनं नुकतंच २३० विशेष रेल्वेसोबतच आणखीन ८० रेल्वे चालवण्याची घोषणा केलीय. याचसोबत करोना काळात प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये, तसंच त्यांना वेटिंग तिकिटाच्या समस्येला तोंड द्यावं लागू नये, याचीही काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेतली जातेय. यासाठीच रेल्वेकडून ” योजना सुरू करण्यात येतेय.

विशेष रेल्वेचं संचालन

क्लोन रेल्वे योजनेद्वारे नागरिकांना मिळाल्यानंतरही आसन उपलब्ध होऊ शकेल. दीड-एक महिन्याच्या लांबलचक वेटिंग लिस्टच्या समस्येपासून नागरिकांच्या सुटकेसाठी रेल्वेनं क्लोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणाऱ्या अधिकच्या ८० विशेष रेल्वेसोबतच क्लोन रेल्वेचीही घोषणा करण्यात आली.

वाचा :

वाचा :

काय आहे ‘क्लोन रेल्वे’ योजना?

‘क्लोन रेल्वे’ योजनेत रेल्वे प्रशासनाकडून ज्या रेल्वेमध्ये जास्त वेटिंग लिस्ट असेल अर्थात ज्या मार्गावर प्रवाशांकडून प्रवासाची मागणी वाढलेली दिसेल त्या मार्गावर या ‘क्लोन रेल्वे’ चालवण्यात येतील. गरजेनुसार आणि लांबलचक वेटिंग लिस्ट असलेल्या रेल्वेनंतर त्याच मार्गावर त्याच क्रमांकाची आणखी एक रेल्वे चालवण्यात येईल. या क्लोन रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना मिळू शकेल आणि प्रवास करणं त्यांना सहजशक्य होईल.

उदाहरच द्यायचं झालं तर, बिहारहून दिल्लीला निघालेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ही रेल्वे सुटल्यानंतर त्याच क्रमांकाची, त्याच मार्गावर दुसरी ट्रेन चालविली जाईल. या रेल्वेत वेटिंग लिस्टवर असणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळू शकेल. या दोन्ही रेल्वे एकाच प्लॅटफॉर्मवरून निघतील. नाव आणि क्रमांक एकच असल्यानं या रेल्वेला ‘क्लोन रेल्वे’ म्हटलं गेलंय.

वाचा :

वाचा :

गुरुवारपासून रेल्वे रिझर्व्हेशन

२३० विशेष रेल्वेशिवाय सुरू होणाऱ्या नवीन ८० विशेष रेल्वेसाठी रिझर्व्हेशन येत्या गुरुवारपासून (१० सप्टेंबर) सुरू होणार आहे. या विशेष ८० रेल्वे अर्थात ४० जोडी रेल्वे (येणाऱ्या – जाणाऱ्या) १२ सप्टेंबरपासून चालवण्यात येणार आहेत. ज्या मार्गावर वेटिंग लिस्टच्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचं दिसेल त्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून क्लोन रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं यादव यांनी म्हटलंय.

परीक्षा किंवा अन्य कोणत्याही उद्देशासाठी राज्य सरकारांकडून विनंती करण्यात आली तर रेल्वेकडून गाड्यांची सोय करण्यात येईल, असंही आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलंय. रेल्वेच्या जवळपास १.४० लाख पदांच्या भर्तीसाठी १५ डिसेंबरपासून ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यात येणार असल्याचंही रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटलंय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here