म. टा. खास प्रतिनिधी मुंबई: देशातील दुसरे सर्वाधिक व्यग्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या क्रमवारीत जगात चौथ्या स्थानी आहे. विमानतळाने आशिया-पॅसिफिक क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून (एसीआय) विमानतळाला प्रमाणपत्र मिळाले आहे.

‘एसीआय’ ही जगभरातील विमानतळ चालविणाऱ्या कंपन्यांची संघटना आहे. संघटनेकडून जगभरातील विमानतळांचे विविध स्तरावर सर्वेक्षण करून त्यानुसार मानांकन, पुरस्कार आणि प्रमाणपत्र दिले जाते. याअंतर्गतच विमानतळाने अलिकडेच ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेसंबंधी सर्वेक्षण केले. त्यात मुंबईचे विमानतळ ग्राहक अनुभवात देशात सर्वोत्तम ठरले आहे. असे प्रमाणपत्र मिळणारे हे देशातील पहिलेच विमानतळ आहे.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
प्रवाशांच्या वेळेची बचत

विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनुसार (मिआल), विमानतळाने टर्मिनल आवारात वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष फास्टॅग संरचना उभी केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा त्रास वाचला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ५,७३५ चौरस मीटरचे क्षेत्र सुरक्षा तपासणीसाठी निश्चित केले आहे. याखेरीज आंतरराष्ट्रीय टर्मिनलमधून देशांतर्गत टर्मिनलमध्ये जाण्यासाठी ३२८ चौरस मीटरवर विशेष संरचना, २,०७५ चौरस मीटरवर विशेष प्रवासी क्षेत्र उभे केले आहे. प्रवासी क्षेत्रासाठी २,०७५ चौरस मीटरचे क्षेत्र हे देशात सर्वात मोठे आहे. या सुविधांमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. या प्रकारच्या सुविधांमुळेच विमानतळाला सर्वोत्तम ग्राहक अनुभवाचे चौथ्या स्तराचे प्रमणापत्र मिळाले आहे. हा उच्च स्तरावरील असतो.

प्रेमाचा हृदयद्रावक अंत, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेने आयुष्य संपवलं, मग पार्टनरनेही…
एकाच धावपट्टीवरील विमानतळ

मुंबईच्या या विमानतळाला दोन धावपट्ट्या आहेत. मात्र त्या एकमेकांना छेदतात. त्यामुळे एकावेळी एकच धावपट्टी उपयोगात येते. या एकाच धावपट्टीवरून ताशी सरासरी ३८ ते ४० व २४ तासांत ९००हून अधिक विमानांची ये-जा होते. अशाप्रकारे एकाच धावपट्टीवरून इतक्या विमानांची हाताळणी होणारे हे जगातील एकमेव विमानतळ आहे. मुंबईच्या विमानतळाने ताशी ५४ व २४ तासांत १००६ विमानांची विक्रमी हाताळणी डिसेंबर २०१८मध्ये केली आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here