नाशिक : नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला गेलेला आहे. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातील तीनही आमदार मनसेतर्फे निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या २०१२ च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी शहराची सत्ताही मनसेच्या ताब्यात दिली होती. मात्र पुढे २०१४ साली मोदी लाटेत मनसेचे सगळेच वाहून गेले. त्यानंतर पक्षाला मोठी गळती लागली, अजूनही मनसेतील जुने जाणते नेते पक्ष सोडून जात आहेत. माजी आमदार नितीन भोसले यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

MNS Nitin Bhosale joins NCP

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष नितीन भोसले हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते आणि नाशिक पूर्व मतदारसंघातून उत्तमराव ढिकले हे निवडून आले होते. २०१४ साली वसंत गीते यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला, पुढे ते ठाकरे गटात दाखल झाले. उत्तमराव ढिकले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र राहुल ढिकले हे काही काळ मनसेत सक्रिय राहिले, मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी देखील भाजपची वाट धरली.

ठाकरेंचा वरचष्मा, मुस्लीम मतदारही बक्कळ; लोकसभेच्या ‘या’ जागेने वाढवलं फडणवीसांचं टेन्शनया सर्व कालखंडात मनसेचे २००९ साली निवडून आलेले नितीन भोसले हे सक्रिय नसले, तरी ते मनसे सोबतच होते. २०१९ साली नाशिक मध्य मतदारसंघातून त्यांनी विधानसभा देखील मनसेच्या तिकिटावर लढवली होती. आता या नितीन भोसलेंनी म्हणजेच २००९ साली बालेकिल्ल्यात निवडून आलेल्या तिघांपैकी तिसऱ्याही आमदाराने मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. नेमका नितीन भोसले यांनी हा निर्णय का घेतला? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, थेट राजस्थानच्या माजी मंत्र्यांचाच शिवसेनेत प्रवेशकाहीच महिन्यापूर्वी नितीन भोसले यांचे चुलत बंधू आणि मनसेचे शहर समन्वयक असलेले सचिन भोसले यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. नितीन भोसले यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणे हा नक्कीच मनसे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती यावेळी भोसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

‘गणपती तुमचा, किंमत ही तुमचीच’ उपक्रमाला राज ठाकरेंची भेट; कार्यकर्त्यांचा गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here