कोल्हापूर: मी काय अतिरेकी नाही, मी काय गुंड नाही, मी एक शेतकरी आहे. मला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायची आहे मला फक्त पाच मिनिटे द्या, आशा आशयाचे पोस्टर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेत शेतकऱ्यांनी झळकावले. मात्र त्वरित पोलिसांनी हे पोस्टर ताब्यात घेतले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलायला उभे राहिल्यानंतर काहीवेळातच अनेक नागरिक सभेतून निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोल्हापुरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तपोवन मैदान येथे उत्तरदायित्व सभा पार पडली. महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दसरा चौकात निर्धार सभा पार पडली होती. या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडून ही उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभेची जोरदार तयारी केली होती. संपूर्ण शहरात फ्लेक्स आणि बॅनर आणि कटआउट लावत संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय केलं होत. अजित दादा कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांचा जंगी स्वागत हे करण्यात आले. भला मोठा हार आणि बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत अजितदादा हे तपोवन मैदान येथे सभास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत अजित पवार गटामधील मंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar In Pune: फक्त बॅनर लावून भागत नाही, मुख्यमंत्रिपद मिळणे हा नशीबाचा भाग: अजित पवार

शेतकऱ्यांनी झळकवले बॅनर

कोल्हापुरातील या उत्तरदायित्व सभेसाठी शहरात पक्षाकडून फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले होते. त्याची चर्चा तर संपूर्ण शहरात सुरू होती. मात्र, या फ्लेक्स आणि बॅनर व्यतिरिक्त सभेत एका शेतकऱ्याने फडकवलेल्या बॅनरची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू असून कृषी मंत्री धनंजय मुंडे हे भाषणासाठी उभे राहताच प्रेक्षकांमध्ये बसलेले शेतकरी उभे राहिले आणि हातातील बॅनर उघडले आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. या फ्लेक्स वर शेतकऱ्यांनी “मी काय अतिरेकी नाही, मी काय गुंड नाही, मी एक शेतकरी आहे.मला शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायची आहे मला फक्त पाच मिनिटे द्या” असे लिहिले होते. यामुळे येथे काही का तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बॅनर काढून घेतला. मात्र, मंत्र्यांना शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी पाच मिनिट ही नाहीत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Ajit Pawar: महायुतीत का सामील झालो, अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत सांगितलं कारण…

अजित पवार बोलत असताना नागरिक गेले उठून

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापुरात दाखल झाले यावेळी त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. यासाठी हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर सभास्थळी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. अगदी कोल्हापूर सह सांगली, सातारा येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक भाषण ऐकण्यासाठी आले. सभेला मोठी गर्दी देखील झाली. नेत्यांची भाषण सुरू झाले. आणि शेवटला अजित दादा हे बोलण्यासाठी उभारले मात्र दुपारपासून ताटकळत बसलेले नागरिक हे अजितदादांचे भाषण सुरू असतानाच उठून जाऊ लागले. यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या झालेल्या पाहायला मिळाल्या.

‘हम आह भरते है तो बदनाम होते है, वो कतल करते हे लेकीन चर्चा तक नही होती’

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जेवढी गर्दी आत आहे तेवढीच बाहेर आहे आणि ही गर्दी साक्ष देते महाराष्ट्रातील जनता अजितदादा सोबत आहे, असे म्हणत पवार साहेब ज्यांना गुरू मानतात ते यशवंतराव चव्हाण साहेब देखील असेच सत्तेत गेले होते. त्यावेळी ते सत्तेत जाण्याचं कारण हे मला माझ्या समजाच्यासाठी सत्ता हवी आहे असे सांगितले होते. आम्ही देखील आमच्या समाजासाठी सत्तेत गेलो आहोत. ‘हम आह भरते है तो बदनाम होते है, वो कतल करते हे लेकीन चर्चा तक नही होती’, अशी शायरी म्हणत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवारांनंतर कोल्हापुरात अजितदादांची एन्ट्री; सभेची प्रचंड उत्सुकता, पुष्पवृष्टी अन् बाईकरॅलीसह जंगी स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here