सिंधुदुर्ग : गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाकडून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी नियमावली जाहिर करण्यात आली आहे. महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी-इन्सुलीपर्यंतच्या भागासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने वाहनांची कोंडी होवून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हे आदेश काढण्यात आले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून पनवेल ते इन्सुलीपर्यंतच्या भागात वाळू अथवा रेतीने भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवाच्या पुर्वतयारीचा प्रवास व मुर्तीचे आगमन करण्यासाठी चाकरमानी कोकणात येणार असल्याने १६ सप्टेंबर रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पर्यंत ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे.अशा वाहनांची वाहतुक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

पंधरा हजार पाचशे सहासष्ट कोटी महामार्गासाठी अन् साडेसहाशे कोटीत चांद्रयान गेलं राज ठाकरे

५ व ७ दिवसांच्या गणपतींचे व गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर काही चाकरमानी परतीचा प्रवास करत असल्याने २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पासून २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पर्यंत अवजड वाहनांची वाहतूकपुर्णतः बंद राहणार आहे. अनंत चथुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास होवू नये यासाठी सकाळी ८ वा. पासून २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पर्यंत वाहतुकीस बंदी असणार आहे. अवजड वाहनांना २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पासून ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वा. पर्यंत वाहतूकीस परवानगी असणार आहे. तसेच सर्व वाहने २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. नंतर नियमित प्रवास करणार आहेत.

मात्र हे निर्बंध दूध, पेट्रोल/ डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच महामार्ग रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य माल इत्यादी ने- आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. या संदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग अथवा महामार्ग पोलिसांनी प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. असे आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळ जगात भारी, आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून सर्वोत्तम ग्राहक अनुभवाचे प्रमाणपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here