नवी दिल्ली : सोने खरेदीसाठी भारतीय ग्राहकांमध्ये मोठा उत्साह असतो. सणवार असो किंवा घरात कोणतेही शुभकार्य, भारतात सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. तथापि गेल्या काही महिन्यांपासून सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. अशा स्थितीत आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आधी मौल्यवान धातूंचे दर नक्की तपासून पाहा.

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा चढाईने व्यवहार करण्यास सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागत आहे. दरम्यान, भारतीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत संमिश्र व्यवहार होत आहेत. एकीकडे वायदे बाजारात सोन्याचे भाव चढले आहेत तर सराफा बाजारात सोन्यात पडझड पाहायला मिळत आहे.

रोखीने सोने खरेदी करताना सावधान, महत्त्वाचा नियम जाणून घ्या नाहीतर एक चूक पडेल महागात
आजचा सोन्या-चांदीचा भाव काय
गुडरिटर्न्सच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतभर २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात नाममात्र घसरण झाली आहे तर चांदीचा प्रति किलो भाव स्थिर आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोने अवघ्या १० रुपये स्वस्ताईसह ५८ हजार ८४० रुपये तर २४ कॅरेटचे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९ हजार ८३० रुपयांवर आला आहे.

दुसरीकडे, सोमवारी मौल्यवान धातूंचे वायदे हिरव्या रंगात रंगले. सोन्याचे फ्युचर्स ५९ हजार रुपयांच्या जवळ तर चांदीचा भाव ७१ हजार रुपयांच्या वर ट्रेंड करत होता. MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) सोन्याचे ऑक्टर फ्युचर्स ५८ हजार ९४२ रुपये प्रति १० ग्रॅम वर सपाट राहिले तर चांदीचे डिसेंबर वायदे ०.२२% उडी घेत ७१ हजार ७२० रुपये प्रति किलोवर आले.

म्युचुअल फंड असावा तर असा, या फंडावर लोकही फिदा, 22 वर्षे सतत देतोय सुपर से भी उपर रिटर्न्स!
अशा प्रकारे सोन्याचा भाव ठरवला जातो
बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढत तर सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होते. याशिवाय जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ जागतिक अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहतात, त्यामुळे सोन्याच्या किंमती उंच उडी घेतात.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

सोन्याच्या शुद्धतेची काळजी घ्या..
सोन्याचे दागिने कसो वा बिस्किटे खरेदी मौल्यवान धातू खरेदी करताना नेहमी शुद्धतेची काळजी घेतली पाहिजे आणि हॉलमार्क पाहूनच खरेदी करण्याचा अनेकदा सल्ला दिला जातो. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध असते तर २२ कॅरेट सोने अंदाजे ९१% शुद्ध आहे. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे नऊ टक्के इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने सर्वात जास्त शुद्ध असले तरी त्यातून दागिने बनवता येत नाही. २४ कॅरेट सोन्यावर ९९९ अंकित असते तर २२ कॅरेट सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here