पालघर: राज्यातील सर्वात गरीब आमदार अशी ओळख असलेले माकपचे आमदार विनोद निकोले यांनी नागरिकांना देण्यात येणाऱ्या त्रासाच्या मुद्द्यावरुन पोलिसांना फैलावर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या नाकाबंदीमुळे डहाणू शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला वारंवार विनंती करुनही दाद न मिळाल्यामुळे आमदार विनोद निकोले यांनी रस्त्यावर उतरत पोलीस यंत्रणेला धारेवर धरले. यावेळी विनोद निकोले यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. पोलीस त्यांची बराच काळ समजूत काढत होते. मात्र, संतापलेल्या विनोद निकोले यांनी सर्वांदेखत पोलीस अधिकाऱ्याला फैलावर घेतले.

पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; गाय तस्करांनीच केले पोलीस हवालदाराचे अपहरण, नाकाबंदी करून अटक

डहाणू जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर संखे हे सामान्य नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या. त्यानंतर माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आक्रमक पवित्रा घेत तारपा चौकात पोलिसांना विचारणा केली.नागरिकांना तुम्ही का त्रास देता, मला तुमची नाटकं सांगू नका, अशा शब्दात आमदार विनोद निकोले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. आमदार निकोले यांचा आक्रमक बाणा पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली. डहाणूच्या मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी लागणार नाही. यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही, असा शब्द त्यांनी आमदार महोदयांना दिला.

Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून ऑपरेशन आउट, तब्बल ३३९ जणांची धरपकड, सहा हजार वाहनांची तपासणी, कारण…

नेमकं काय घडलं?

डहाणू शहरातील मुख्य चौकात पंधरा ते वीस पोलिसांकडून रोज कारवाई करण्यासाठी नाकाबंदी केली जाते. यामुळे मुख्य शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते . त्यामुळे ही कारवाई मुख्य चौकात न करता तपासणी नाक्यांवर करण्यात यावी अशी मागणी विनोद निकोले यांनी डहाणूचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली होती . मात्र तरीदेखील डहाणू पोलिसांकडून ही कारवाई मुख्य चौकातच केली जात असल्याने आक्रमक झालेल्या विनोद निकोले यांनी आज भर रस्त्यात पोलीस प्रशासनाला धारेवर धरले . डहाणू सोडून जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये ही कारवाई का केली जात नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्यापासून जर या चौकात वाहतूक पोलीस सोडून कोणी दिसलं तर दोन हजार लोक घेऊन पोलीस स्टेशनच्या आत मध्ये बसेन, असा इशारा निकोले यांनी पोलिसांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here