जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस. सरकारने अध्यादेश काढला पण त्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीवर काहीच विचार न झाल्याने जरांगेंनी टोकाचा निर्णय घेतला आहे. जीआरमध्ये अपेक्षित सुधारणा न झाल्याने सरकारला जरांगेंनी दिलेला ४ दिवसांचा अल्टिमेटम संपला. त्यामुळे काल सकाळपासून त्यांनी पाणी त्याग केले, आणि सलाईन सुद्धा बंद केली आहे. त्यामुळे सध्या मनोज मनोज जरांगे पाटील यांना थकवा आला असून अशक्तपणा वाढला असल्याने ते सध्या पडून आहेत.

दैनंदिन तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला तपासणी करण्यास मनोज जरांगे यांनी विरोध केला. जरांगे यांच्याकडून पाण्याबरोबरच औषधही बंद असताना आता तपासणी देखील बंद केल्याने समर्थकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आज सरकारने काहीतरी ठोस पावले उचलावी, अशी मागणी समर्थक करत आहेत. मनोज जरांगे यांनी जलत्याग आणि सलाईन बंद केल्याने शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढती गर्दी, दोन-तीन दिवस पाऊस पडल्यानंतर जाणवणारा उकाडा, यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागले आहेत. मात्र खुद्द जरांगेंनी आपली प्रकृती चांगली असल्याचा दावा केला आहे.

तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही, मनोज जरांगे पाटील अजित पवारांना काय म्हणाले?
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या तिन्ही वेळच्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. जरांगे यांच्या शिष्टमंडळाची मुंबईतही बैठक झाली. मात्र, त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन खोतकर शनिवारी अंतरवाली सराटीत पोहोचले होते. त्यांनी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम राहिले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासण्या व उपचार करू दिले नाहीत.

Maratha Reservation: आम्ही मराठा समाजाला काहीही थातुरमातूर देणार नाही, आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगितले. आंदोलकांच्या मागण्यांकडे आम्ही दुर्लक्ष करत नाही. परंतु, इतर समाजाला धक्का न लागता त्यावर तोडगा निघाला पाहिजे. चर्चेतून हा मार्ग निघू शकतो’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here