मुंबई : भाजप आणि शिंदे गटाशी संधान साधून सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर अजित पवार यांच्या महाराष्ट्रात सभा होतायेत. या सभेच्या माध्यमातून आपण सरकारमध्ये का गेलो? यामागची कारणे अजित पवार जनतेला सांगतायेत. यादरम्यान शरद पवार गटातील नेत्यांवर दादांचे मंत्री तुफान हल्लाबोल करतायेत, गतकाळातील आठवणी जाग्या करून त्यावरून प्रश्न विचारतायेत. कोल्हापुरातील सभेत बरगड्या राहणाऱ्या नाहीत, असा इशारा दादा गटाचे नेते-मंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिल्यानंतर त्यांनीही खास स्टाईलने धनभाऊंचा समाचार घेतलाय.

कुणाची पायताणाची भाषा तर कुणाचा कोथळा काढणाचा इशारा!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी सभा घेतली. या सभेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राष्ट्रवादीतील गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा,’ असं हसन मुश्रीफांना उद्देशून वक्तव्य केलं. या टीकेला स्वत: हसन मुश्रीफ यांनी ‘करकरीत कापशीचं कोल्हापुरी पायताण बसलं की कळेल,’ असं उत्तर दिलं होतं. या दोघांच्या जुगलबंदीत फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांनीही उडी घेतली आहे.

तुमच्यासमोर नाक घासायला मागे पुढे पाहणार नाही, मनोज जरांगे पाटील अजित पवारांना काय म्हणाले?
अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. ‘ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का?’ असा सवाल आव्हाडांना करत एवढ्या खालच्या पातळीवर जावून मुश्रीफ साहेबांवर आरोप कराल तर करवीरनगरीतली जनता माफ करणार नाही’, असा इशाराही दिला.

दादा की साहेब? तळ्यात मळ्यात भूमिका असलेल्या आमदाराला दणका, खास नेत्याला तयारीला लागण्याचे शरद पवारांचे आदेश
धनंजय मुंडे यांनी बरगड्या मोडण्याचा इशारा दिल्यानंतर गप्प बसतील ते आव्हाड कसले…? त्यांनीही ट्विटच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना जोरदार उत्तर दिलंय. “कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा”, अशा शब्दात आपल्यावरील टीकेची आव्हाडांनी सव्याज परतफेड केलीये.

मुश्रीफांनी प्रेमानं मिठी मारली तर बरगड्या राहणार नाही, धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here