MNS Raj Thackeray trusts son Amit Thackeray for Pune Loksabha Seat; पुण्यातून मनसेचा पहिला खासदार निवडून आणायचा, राज ठाकरेंकडून अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी
पुणे : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी आहेत. त्यामुळे देशभरात सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठका सुरू आहेत तर दुसरीकडे एनडीएने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. इतकंच नाही तर देशभरातील प्रादेशिक पक्ष देखील लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास करून पुणे जिल्ह्यावर आपलं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. राज ठाकरे यांचे पुण्यातील दौरे गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे मनसेने आपला पहिला खासदार पुण्यातून निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचा पाहायला मिळत आहे.
नरेंद्र मोदींची थेट माजी पंतप्रधानांशी हातमिळवणी, लोकसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा दुसरीकडे, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दावा ठोकला होता. आपल्याला संधी दिली तर मनसेचा पहिला खासदार हा पुण्यातून असेल असं वंसत मोरे म्हणाले होते. वसंत मोरे यांचे शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत असलेले नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे मोरे यांच्या नावावर किती एकमत होईल यात शंकाच आहे. मात्र आता खुद्द अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या बैठकीत काय चर्चा होते? मोरे आपला दावा ठाकरे यांच्यासमोर ठोकणार का ? याकडे पुणे शहराचे लक्ष लागले आहे.
‘गणपती तुमचा, किंमत ही तुमचीच’ उपक्रमाला राज ठाकरेंची भेट; कार्यकर्त्यांचा गर्दी