मुंबई : यावर्षी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चच्या गौतम अदानींवरील अहवालाची बरीच चर्चा रंगली. हिंडेनबर्गने अदानी समूहावर शेअर्सच्या किंमतीत फेरफार आणि फसवणुकीचा आरोप केल्यानंतर संपूर्ण प्रकरण देशाच्या संसदेतही गाजलं. उद्योगपती गौतम अदानींच्या शेअर्सच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या प्रमुख उद्योग समूहांपैकी एक अदानी समूहाच्या शेअर्समध्ये LIC म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या गुंतवणुकीबाबत सरकारविरोधात मोर्चा काढला.

एलआयसीने गौतम अदानींना मोठे कर्ज दिले असून ते कधीही बुडू शकते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. परंतु एलआयसीबाबत संसदेत गदारोळ होण्याची ही पहिली वेळ नाही. ६६ वर्षांपूर्वीही एलआयसीच्या शेअर्सबाबत संसदेत बराच गदारोळ झाला जो पाहता तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापना करणे भाग पडले होते. विशेष म्हणजे हा घोटाळा त्यांचे जावई आणि राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी यांनी उघड केला होता जो इतिहासात मुंद्रा घोटाळा म्हणून ओळखला जातो.

Ratan Tata: जेव्हा रतन टाटांनी खतरनाक गुंडांशी दोन हात केले होते, नेमकं काय घडलं होतं?
हिवाळी अधिवेशनात संसदेत हंगामा
१६ डिसेंबर १९५७ रोजी काँग्रेस खासदार फिरोज गांधींच्या तातडीच्या सूचनेवरून लोकसभा अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली. फिरोज उठले आणि एलआयसी या वर्षभर जुन्या संस्थेतील घोटाळ्यांबद्दल बोलू लागले. अर्थमंत्र्यांच्या आदेशानंतर एलआयसीने बोगस शेअर्स खरेदी केल्याचा आणि त्याबदल्यात काँग्रेसला अडीच लाख रुपयांची देणगी मिळाल्याचा आरोप फिरोज गांधी यांनी केला. फिरोज यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी संसदेत चांगलाच गदारोळ केला.

कुबेराचे धनी अंबानीच्या खिशात ना कधी कॅश असते, ना क्रेडिट कार्ड, कारणही तितकंच खास!
काय होता मुंद्रा घोटाळा
मुंद्रा घोटाळा १९५७ मध्ये झाला होता. त्यावेळी देशात सुमारे अडीचशे लहान-मोठ्या कंपन्या होत्या. 1956 मध्ये संसदेने देशातील नागरिकांना विम्याची हमी देण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आणि २४५ कंपन्यांचे विलीनीकरण करून LIC ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी सरकारने त्यात ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एलआयसी त्यांच्या पॉलिसीनुसार गुंतवणूक करत असे. ९५७ मध्ये एलआयसीने कोलकात्याचे व्यापारी हरिदास मुंद्रा यांच्या कंपनीचे शेअर्स १.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मुंद्राच्या कंपनीचा आर्थिक रेकॉर्ड चांगला नव्हता. अशा स्थितीत या करारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले.

Throwback: लाखोंची मर्सिडीज सोडून मुकेश अंबानींनी पत्नीसाठी केलेला डबल डेकरने प्रवास, काय आहे कारण?
सासरे-जावई आमनेसामने आले
भांडाफोड झाल्यानंतर राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी यांनी आपले सासरे नेहरू यांच्याविरोधात आवाज उठवला. मुंद्रा यांनी आपल्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी LIC कडून गुंतवणूक करून घेतली तेव्हा सरकारने त्याला विरोध का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांनी योग्य उत्तर दिले, मात्र पुढे त्यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला.

या प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन निवृत्त न्यायाधीश एम. सी. छागला यांनी केला होता. मात्र, तपासात देणगीचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here