रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील सप्तलिंगी नदीत दोन सख्खे भाऊ बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेला दुसरा भाऊही बुडाला आहे. यातील गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले (वय ३७ वर्षे) याचा मृतदेह मिळाला आहे. तर भाऊ सचिन झेपले हा अद्याप बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचं काम सप्तलिंगी नदी परिसरात युद्ध पातळीवर सुरू आहे. ही धक्कादायक घटना १० सप्टेंबर रोजी रविवारी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास घडली आहे. गणेशचा भाऊ सचिन झेपले आणि त्याची पत्नी योगिता, मुलगी आकांक्षा हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुर गावातील सप्तलिंगी नदीवर चिरेकोंड या ठिकाणी कपडे धुण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी गेले होते. कपडे धुवून झाल्यानंतर सचिन उर्फ बाल्या रामचंद्र झेपले हा नदीच्या बंधाऱ्यावर जावून सायंकाळच्या सुमारास आंघोळ करीत असताना त्याचा पाय घसरुन तो डोहात बुडाला.
जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर… ही घटना लक्षात येताच त्याची पत्नी योगिता ही जीवाच्या आकांताने ओरडत घरी आली. दीर गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले याला येवून सांगितले. आपला भाऊ नदीत बुडाल्याचं कळताच गणेशही नदीकडे धावत गेला आणि त्याने भावाला वाचवण्यासाठी थेट नदीत उडी घेतली. पाठोपाठ योगिता सचिन झेपले या देखील गेल्या. त्यानंतर त्यांना दीर गणेश आणि तिचा पती नदीच्या पाण्यात दिसले नाहीत. तोवर अन्य लोकही या ठिकाणी जमा झाले होते.
प्रेमाचा हृदयद्रावक अंत, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेने आयुष्य संपवलं, मग पार्टनरनेही… वाडीतील लोकांनी तात्काळ नदी किनारी शोध मोहीम सुरू केली. त्या दोघांपैकी बुडालेला सचिन याला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा भाऊ गणेश उर्फ सागर रामचंद्र झेपले हा सापडला. त्याला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात देवरुखला आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितलं. या सगळ्या दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकाराने देवरुख पूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, झेपले कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हे दोन्ही भाऊ मोलमजुरी आणि किरकोळ कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. देवरुख पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून सप्तरंगी परिसरात अद्याप बेपत्ता असलेल्या सचिनचे शोध कार्य सुरू आहे.
काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना