छत्रपती संभाजीनगर: देशी विदेशी पर्यटकांना भुरळ पाडणारी अजिंठा लेणी बघण्यासाठी देशासह विदेशातून पर्यटक येत असतात. नेदरलँड येथून तीन विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते. अजिंठा लेणी पाहून एसटी महामंडळाच्या बसने परतत असताना अचानक एसटी बस मध्ये धूर निघाला. अचानक धूर निघू लागल्यानं बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. प्रवासी तातडीनं आपत्कालीन दरवाजाने बाहेर पडले. यानंतर बस चालकाने तपासणी केली असता बसचे लाइनर जाम झाल्याने बस मधून दूर निघाल्याचं समोर आलं. त्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध देशातील देशी विदेशी पर्यटक जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळांना भेटी देत असतात. यामध्ये वेरूळ अजिंठा लेणी बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक प्राधान्य देत असतात. देशी विदेशी पर्यटकांना भुरळ पाडणारे अजिंठा लेणी बघण्यासाठी नेदरलँड येथून तीन विदेशी पर्यटन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आले होते. अजिंठा लेणी बघितल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर ते जामनेर आगाराच्या भुसावळ ते संभाजीनगर बसने एम एच २० बी एल ३४५४ या बसने संभाजीनगर कडे येत होते. यावेळी फुलंब्री बस स्थानक परिसरात बस आल्यानंतर बस मधून अचानक धूर निघायला लागला. यावेळी वाहन चालकाने बस थांबवली मात्र दूर निघू लागल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी बसमध्ये बॉम्ब असल्याची चर्चा केली. त्याचवेळी सर्व प्रवासी आपत्कालीन रस्त्याने बाहेर पडले.

दादा की साहेब? तळ्यात मळ्यात भूमिका असलेल्या आमदाराला दणका, खास नेत्याला तयारीला लागण्याचे शरद पवारांचे आदेश

असा झाला उलगडा

बसच्या मागील चाकाजवळून धूर निघत होता. आपत्कालीन दरवाजातून प्रवासी खाली उतरले. त्यानंतर बस चालकाने खाली उतरून बसची पाहणी केली असता बसचे लायनर जाम झाल्याने बसमधून धूर निघत असल्याचा समोर आलं. यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या दरम्यान थांबलेल्या पर्यटकांना आणि प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहावी लागली.
पुण्यातून मनसेचा पहिला खासदार निवडून आणायचा, राज ठाकरेंनी घरच्या माणसावर टाकली मोठी जबाबदारी
या घटनेमुळं राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची दुरावस्था पुन्हा चर्चेत आळी आहे. चांगल्या स्थितीत असणाऱ्या बसेस सोडल्या जाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, बरगड्या मोडतील-नादाला लागू नका, जितेंद्र आव्हाडही नडले, कोथळा काढण्याचा इशारा!

स्वाभिमानी लोकांना सन्मानाची अपेक्षा, कोणासमोर झुकणार नाही, पंकजा मुंडेंचं सूचक विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here