दक्षिण महाराष्ट्रात असलेल्या , सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात आत्तापर्यंत ८५ हजार ८६० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात रोज हजारच्या आसपास नव्या रुग्णांची भर पडत असल्याने एकूण रुग्णांची संख्या लाखावर पोहोचण्यास फार वेळ लागणार नाही. यामुळे दक्षिण महाराष्ट्र सध्या करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात त्याचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. या भागात आत्तापर्यंत साधारणत तीन हजार लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे, तर त्यावर ४० हजार लोकांनी मात केली आहे. अजूनही ४५ ते ५० हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा:
दक्षिण महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची टंचाई आहे. रुग्णांना वेळेत खाटा मिळत नाहीत. रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे. आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण वाढला आहे. खासगी रुग्णालये आरक्षित करूनही रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. कोल्हापुरात कोव्हिड जम्बो सेंटर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्याचे दक्षिण महाराष्ट्रात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्यामुळे उपचाराअभावी अनेकांचे तडफडून जीव जात आहेत.
वाचा:
या भागात वाढत असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनीही वाढत्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त केली. त्याला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांना व्यक्तींना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आणि गडिंग्लज नगरपरिषद आणि पुन्हा जनता कर्फ्यू लागू केला आहे, तर सांगली जिल्ह्यात इस्लामपूर, पलूस या शहरांमध्ये जनता कर्फ्यू सुरू आहे.
वाचा:
दक्षिण महाराष्ट्रातील एक खासदार, एक मंत्री आणि दहा आमदारांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. अधिकाऱ्यांची संख्या तर प्रचंड आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दक्षिण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या संसर्गाचा अर्थकारणावरही गंभीर परिणाम होत आहे. यामुळे सरकारने गांभीर्याने घेतले असून साखळी तोडण्यासाठी आता प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times