पाटणा: बिहारच्या बेतिया जिल्ह्यात एका मच्छिमाराच्या जाळ्यात अजब मासा सापडला. हा मासा सध्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. जाळ्यात अडकल्यानं मासा पाण्याबाहेर आला. त्याची शारीरिक ठेवण इतर माशांपेक्षा वेगळी असल्यानं हा मासा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. बेतिया जिल्ह्यातील लौरियामधील सिसई पंचायतीत येणाऱ्या लाकड गावात अनोखा मासा सापडला आहे. गावाजवळून वाहणाऱ्या नदीत हा मासा आढळून आला. त्याचा आकार विमानासारखा आहे. रंग काळा असून चार डोळे आहेत. हा मासा प्रजातीचा असल्याचं लोक सांगत आहेत. सकरमाऊथ कॅटफिश प्रामुख्यानं अमेरिकेच्या नद्यांमध्ये सापडतो.अजब माशाला पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकरमाऊथ कॅटफिश अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत आढळून येतो. साधारणत: असे मासे दुसऱ्या माशांची अंडी खातात. लाकड गावात राहणाऱ्या विरेंद्र चौधरींनी नदीत असे दोन मासे पकडले. चौधरी यांनी त्यांच्या घरी मासे सुरक्षित ठेवले आहेत.अमेरिकेत आढळून येणाऱ्या सकरमाऊथ कॅटफिश प्रजातीचे मासे काहींनी घरातील फिशटँकमध्ये ठेवण्यासाठी आणले होते. यातील काही मासे कालांतरानं नद्यांमध्ये सोडण्यात आले. त्यामुळे गंडक, कोसी, गंगा नद्यांमध्ये हे मासे आढळून येऊ लागले. या माशांचं प्रजनन वेगानं होतं. हे मासे बाकीच्या माशांसाठी कर्दनकाळ ठरतात. सकरमाऊथ कॅटफिश अन्य माशांची अंडी खातात. इतर माशांवरही हल्ले चढवतात. त्यामुळे हा प्राणी घातक मानला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here