हायलाइट्स:

  • मित्राला फसवलं
  • शेअर मार्केट ट्रेडिंगचं आमिष
  • ५० जणांना फसवलं
म. टा. प्रतिनिधी ठाणे : गुंतवलेले पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून दरमहिना सात टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ५०पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईतील घाटकोपरमध्ये वास्तव्यास असलेले अमोल (तक्रारदाराचे नाव बदलले आहे) खासगी कंपनीत वेब डेव्हलपर म्हणून काम करतात. त्यांच्या एका मित्राने गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून ते पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत गुंतवणूकदारांना मुद्दल रक्कमेसह चांगला परतावा देतो, असे त्या मित्राने अमोल यांना सांगितले. कंपनीत एक लाख गुंतवल्यास दर महिना एक टक्का टीडीएस कपात करून सात टक्के म्हणजेच ६ हजार ४०० रुपये परतावा १ ते १० तारखेच्या आत दिला जातो. तसेच, मुद्दल रकमेची मागणी केल्यानंतर एक आठवड्यात मुद्दल रक्कमही देण्याचे आश्वासन मित्राने दिले. ही गुंतवणूक योजना अमोल यांना आवडली. त्यामुळे ते वागळे इस्टेटमधील मित्राच्या कंपनीच्या कार्यालयात आले. मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अमोल यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन लाखांची गुंतवणूक केली.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर पुन्हा पाऊस रुसला, या तारखेपर्यंत राज्यभर कुठेही पाऊस नाही
अमोल यांच्या गुंतवणुकीच्या रकमेवर फेब्रुवारीपर्यंत त्यांना ३८ हजार ४५० रुपयांचा परतावा मिळाला. परंतु, अचानक एप्रिलमध्ये मित्राने अमोल याला फोन करून कंपनी बंद करत आहे. लवकरच तुमचे दोन लाख रुपये परत करतो, असे आश्वासन दिले.
वाकचौरेंना प्रवेश, बबनरावांचा पावलोपावली अपमान, सेनेत नाराजीचा स्फोट, थेट बाळासाहेबांना पत्र
मात्र, मित्र कंपनीच्या कार्यालयाला टाळे लावून तसेच घर सोडूनही निघून गेल्याचे समजले. अमोल यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव गेल्यानंतर त्याठिकाणी बऱ्याच लोकांची गर्दी झाल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. मित्राने आपल्यासह इतरही गुंतवणूकदारांचीही फसवणूक केल्याचे अमोल यांना समजले. अमोल यांच्या तक्रारीनंतर पन्नासपेक्षा जास्त गुंतवणूकदारांची २ कोटी ४० लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मित्रासह त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणूक आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ठाण्यात राहत असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
अजितदादांसोबतचा ‘तो’ व्हिडिओ लागला, अन् सुप्रिया सुळे डोळ्याला पदर लावून रडू लागल्या, पाहा VIDEO

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here