मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या एका व्यक्तीने ३० वर्षीय महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्नाटक राज्यातील एका ३० वर्षीय महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती बोरिवली येथे राहण्यास आहे. तर पीडित महिला कर्नाटक राज्यात राहणारी आहे.
आरोपी व्यक्ती खाजगी क्लासेस चालवत असून आरोपीचे आणि पीडित महिलेची वर्षभरापूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दरम्यान आरोपीने पीडित महिलेला आपल्या क्लासेसमध्ये पार्टनरशिप देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने या महिलेला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलवून तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत पीडित महिलेने शनिवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
अनेक वेळा पोलीस देखील सांगतात की सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करा. मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष करून सोशल मीडियाचा वापर जास्त पद्धतीने करून वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटनाना बळी पडल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकानेच सोशल मीडियाचा वापर अयोग्य पद्धतीने न करता गरजेप्रमाणे करा असे वेळोवेळी आवाहन केले जाते. त्याकडे लक्ष दिले तर अनेक अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल.