घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कोपार्डे येथे राहणारा मंथन बेंडकळे हा बी.टेक चं शिक्षण घेऊन पदवीधर झाला होता. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता.पण, मुलाखतीमध्ये येतअसलेल्या अपयशाने तो नैराश्यामध्ये जात होता. काल रविवारी दुपारी त्याला कंपनीच्या नोकरीसाठी कॉल आल्याने ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी तो घरी एकटाच होता.आईवडील ढेबेवाडी येथे गावी गेले होते. तर भाऊ सागर मंडळाच्या मंडप उभारणीसाठी कुंभी कारखान्यावर गेला. यावेळी मंथनचे आईवडील त्याला चार वाजल्यापासून फोन करत होते पण तो उचलत नव्हता. मात्र परिक्षेत व्यस्त असेल म्हणून आई वडिलांनी दुर्लक्ष केले.
रात्री १० च्या सुमारास भाऊ सागर घरी आला यावेळी वरच्या मजल्यावर मंथनने लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने नातेवाईक व मित्रांना आणि पोलीसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर सी.पी.आर रुग्णालयात पाठवला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी मंथनने सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका. गैरसमज नको मी जीवनात अपयशी झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली आहे. यापूर्वी मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असेही चिठ्ठीत लिहले होते.या घटनेमुळे आई-वडिलांना जोरदार धक्का बसला असून कोपर्डे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनं कोपर्डे गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.