मुंबई : धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड… राष्ट्रवादीचे दोन तगडे नेते आणि एकमेकांचे जीवलग दोस्तही… पण हेच दोस्त सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. पवारांना बाप मानणारे दोघेही एकमेकांची बरगड्या मोडण्याची आणि कोथळा काढण्याची भाषा करू लागले आहेत. अजितदादांच्या बंडाआधी गळ्यात गळे घालून फिरणारे आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून प्रहार करणारे दोघेही एकमेकांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी झालेत. दादांच्या बंडानंतर जितेंद्र आव्हाड-धनुभाऊंची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? त्याचीच ही गोष्ट….

साल १९९९. जितेंद्र आव्हाडांच्या घरी एक फोन आला.. पलीकडून आवाज आला गोपीनाथ मुंडे बोलतोय.. मुंडे म्हणाले, जितेंद्र तुला विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं मी आणि प्रमोद महाजनने ठरवलंय. तुझं काय म्हणणं आहे ते पत्नी आणि सासऱ्यांशी बोलून ठरवं. पण आव्हाडांनी मेलो तरी पवारसाहेबांना सोडणार नसल्याचं सांगितलं आणि शरद पवारांसाठी मुंडेंची ऑफर नाकारली. तेव्हापासून आजतागायत आव्हाडांच्या मनात गोपीनाथ मुंडेंविषयी खूप आदर आहे. त्याच घराण्यातून धनंजय मुंडे येत असल्याने त्यांच्याबद्दलही आव्हाडांच्या मनात सन्मानाच्या भावना राहिल्या.

जितेंद्र आव्हाड-धनुभाऊंची मैत्री कशी बहरली?

तसेच धनुभाऊ फर्डे वक्ते तर जितेंद्र आव्हाड अभ्यासू मांडणी करण्यात माहिर आहेत. वक्तृत्व हा दोघांसमान समान धागा आहे. जितेंद्र आव्हाड लाखोंच्या सभा गाजविण्यात पटाईत आहेत तर आव्हाड संसदीय भाषणांतून प्रतिस्पर्ध्यांवर शेलके वार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही वंजारी समाजातून येतात, दोघेही ओबासी समाजाचे नेते आहेत. त्यांना समाजाचे प्रश्न माहिती आहेत. या प्रश्नांवरती-धनुभाऊ आणि आव्हाडांमध्ये अनेक वेळा चर्चा व्हायच्या.

धनंजय मुंडे म्हणाले, बरगड्या मोडतील-नादाला लागू नका, जितेंद्र आव्हाडही नडले, कोथळा काढण्याचा इशारा!
आव्हाड आणि धनुभाऊ शरद पवार यांना बापासमान मानतात. विरोधी पक्षातून पवारांवर कुणी टीका केली तर दोघेही संबंधितांवर तुटून पडायचे. शरद पवार राजकारणातले कसे भीष्मपितामह आहेत, हे उदाहरणं सांगून दोघेही पटवून द्यायचे. २०१४ ला राष्ट्रवादी सत्तेतून गेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेतून तर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ले चढवले. तसेच निवडणूक काळात लोकांमध्ये जाऊन भाजपच्या धोरणांवर जोरदार प्रहार केले. यादरम्यान त्यांची मैत्री खुलत गेली.

जशी राजकीय मुद्द्यांवर त्यांच्यात अनेक वेळा गहन चर्चा व्हायची, तसा कौटुंबिक सलोखाही दोघांकडून जपला गेला. दोघांनीही अगदी जीवलग दोस्तासारखं मैत्रीचं नातं जपलं. पण अजित पवार यांनी भाजप-शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादीचा एक गट फोडून दादा सरकारमध्ये सामिल झाले, त्यात धनुभाऊंनी दादांना साथ दिली. पण इकडे जितेंद्र आव्हाडांनी पवारांसोबतच आपली निष्ठा कायम ठेवली. मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, असं आव्हाडांनी ठासून सांगितलं. पवारांच्या धोरणाला प्रमाण मानून ‘साहेब ठरवतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण…’ असं सांगून भाजपविरोधातील लढाईचं रणशिंगच आव्हाडांनी फुकलं. या सगळ्यात धनुभाऊ-आव्हाड यांच्या मैत्रीत अंतर पडलं आणि त्यामुळे धनुभाऊंच्या ‘बरगड्यांना’ आव्हाडांनी ‘कोथळ्याने’ प्रत्युत्तर दिलं!

वाकचौरेंना प्रवेश, बबनरावांचा पावलोपावली अपमान, सेनेत नाराजीचा स्फोट, थेट बाळासाहेबांना पत्र
परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे दादा गटात होते तर आव्हाडांनी पवारांचा शब्द कायम अंतिम मानला. दोन्हीही गट एकत्र असताना राष्ट्रवादीत साहेब आणि दादा अशी छुपी गटबाजी होतीच… त्याच धनुभाऊ दादा गटात होते. अजितदादांचे खास विश्वासू सहकारी म्हणून धनुभाऊंची ओळख होती. अगदी २०१९ ला फसलेल्या शपथविधीदरम्यानही धनुभाऊंचा रोल महत्त्वपूर्ण होता. तर पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतल्याने दादांविरोधात घोषणा देण्यात आव्हाड सगळ्यात पुढे होते.

कुणाची पायताणाची भाषा तर कुणाचा कोथळा काढणाचा इशारा!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी सभा घेतली. या सभेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राष्ट्रवादीतील गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा,’ असं वक्तव्य हसन मुश्रीफांना उद्देशून केलं. या टीकेला स्वत: हसन मुश्रीफ यांनी ‘करकरीत कापशीचं कोल्हापुरी पायताण बसलं की कळेल,’ असं उत्तर दिलं होतं. या दोघांच्या जुगलबंदीत फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांनीही उडी घेतली.

आतापर्यंत मतांचा पाऊस पण यंदा जयंतरावांचा करेक्ट कार्यक्रम? कारण विरोधकांनी तगडी फिल्डिंग लावलीये!
अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का? असा सवाल आव्हाडांना करत एवढ्या खालच्या पातळीवर जावून मुश्रीफ साहेबांवर आरोप कराल तर करवीरनगरीतली जनता माफ करणार नाही, असा इशाराही दिला.

धनंजय मुंडे यांनी बरगड्या मोडण्याचा इशारा दिल्यानंतर गप्प बसतील ते आव्हाड कसले…? त्यांनीही ट्विटच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना जोरदार उत्तर दिलंय. “कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा”, अशा शब्दात आपल्यावरील टीकेची आव्हाडांनी सव्याज परतफेड केलीये.

पवारांसाठी मुंडेंची ऑफर नाकारली, पुतण्याचं बंड पण आव्हाड निष्ठावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here