कोलंबो : पावसामुळे जर आता भारत आणि पाकिस्तान सामन्यात एकही चेंडू खेळला गेला नाही आणि सामना रद्द करण्यात आला तर कोणता संघ विजयी ठरणार, हे समीकरण आता ठरले आहे.पाऊस पडल्यावर डकवर्थ लुईस नियम समोर येतात. या सामन्यात पाकिस्तानचा संघ ११ षटकं खेळला आहे. त्यामुळे या सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू होणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण या नियमानुसार जर आता सामना रद्द झाला तर कोणत्याही संघाला विजयी घोषित करता येणार नाही, असे समोर आले आहे. कारण जर सामन्याचा निकाल लावायचा असेल तर त्यासाठी किमान २० षटकांचा दोन्ही संघांचा सामना होणे अनिवार्य असते. जर २० षटकांचा सामना झाला नाही तर हा सामना रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे जर आता पावसामुळे सामना थांबवला गेला आणि खेळ होऊ शकला नाही तर हा सामना रद्द केला जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तानची २० षटकं पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत कोणताही संघ विजयी ठरू शकणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाची २० षटकं कधी पूर्ण होतात, याची उत्सुकता आता भारताच्या चाहत्यांना असेल. त्यामुळे आता पावसानंतर खेळ कधी सुरु होतो आणि ही ९ षटकं कशी खेळवली जाऊ शकतात, याचा विचार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी करायला हवा. कारण जोपर्यंत २० षटकांचा खेळ होता नाही, तोपर्यंत कोणताही संघ विजयी ठरू शकत नाही. त्यामुळे आता पावसानंतर खेळ सुरु होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २० षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला तर पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते, जाणून घ्या संपूर्ण समीकरण आता समोर आले आहे. २० षटकांत पाकिस्तानला विजयासाठी २०० धावा कराव्या लागतील. त्यामुळे आता हा सामना किती षटकांचा होतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here