मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला जन्मता: हृदयविकार असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीध्ये स्पष्ट झाले आहे. जन्मत: हृदयाविकार असल्याने रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिकचे बालरोग हृदयरोग तज्ञ डॉ. पंकज सुगावकर यांनी मुलाच्या हृदयाची तातडीने शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमध्ये मुलांच्या हृदयाचा घट्ट झालेला झडपा (व्हॉल्व) मोकळा करण्यात आला. या मुलाला दोन महिने रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय पथकाच्या बालरोग अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. हृदयविकाराच्या वेळी ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे तो सुमारे दीड महिना कोमामध्ये होता. त्यामुळे त्याला बरे होण्यास अधिक वेळ लागला.
बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत उदावंत म्हणाले की, मुलांची प्रकृती लक्षात घेऊन आधुनिक उपचारांच्या मदतीने हृदयविकारातून आणि कोमातून त्याला बरे करण्यात आले. या मुलाला सोमवारी ४ सप्टेंबरला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. बारा वर्षाच्या मुलाला हृदयविकाराच्या झटक्यातून बरे करणे ही वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रगती मानली जात आहे. डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीबद्दल रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रांट आणि मुख्य कार्यकारी अधीकारी बेहराम खोडाईजी यांनी अभिनंदन केले आहे.