संतोष शिराळे, सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर रविवारी रात्री उशिरा जाळपोळीची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ ते १७ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि जाळपोळकरुन नुकसान, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि खून असे वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २३ जणांना अटक करण्यात आली आहे तर अन्य सहभागी असणाऱ्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या पुसेसावळी येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून या भागात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करताना काहीजण दिसत आहे.

सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तणावाचं वातावरण..

पुसेसावळीतील या प्रकरणात एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतेदह ताब्यात घेण्यास समुहाने नकार दिला होता.यामुळे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतल्यानंतर काही वेळ रुग्णालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांच्या आश्वासनानंतर मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Ravi Rana : रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात, ठाकरे गटानं आरोप फेटाळले, काय घडलं?

पोलिसांचं शांततेचं आवाहन

या घटनेनंतर कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे .कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा असे आवाहन त्यांनी केले आहे.

सातारा प्रशासन स्थानिकांच्या पाठीशी आहे गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्याचे काम प्रशासन करत आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा असं आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.
पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण ठरेल विजेता, भारत की पाकिस्तान जाणून घ्या…
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील सर्व समाजघटकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. या घटनेनंतर पुसेसावळीला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून सर्वत्र शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे
Virat Kohli-KL Rahul Record: विराट-राहुल जोडीने पाकिस्तानला बेदम चोपला; द्विशतकी भागिदारीत झाले ८ मोठे रेकॉर्ड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here