नवी मुंबई: शहरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरामध्ये ही घटना घडली असून आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पब मॅनेजरने ग्राहकाकडे बिलाचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने मॅनेजरवर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये मॅनेजर जखमी झाला आहे. तसेच ही घटना घडताच नवी मुंबईचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा हल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांसोबतही आणि अरेरावीची भाषा केली. बिलाचे पैसे मागितल्यामुळे झालेल्या या हल्ल्यातून आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोशल मीडियावर मैत्री कर्नाटकातील महिलेला पडली महागात; एकत्र काम करण्याचं आमिष देत बोलवलं मुंबईत अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये ग्राहकाकडे पैसे मागितल्यावर त्या ग्राहकाने डायरेक्ट पब मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. पब मॅनेजरने ग्राहकाकडे पैसे मागितले. त्यावेळी ग्राहकाने दादागिरी करत मी इथला भाई आहे. माझ्याकडे पैसे मागतो का? तू पैसे मागणारा कोण, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न करून डायरेक्ट मॅनेजरवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पब मॅनेजर जखमी झाला. पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना घडतात घटनास्थळी ताबडतोब नवी मुंबईचे पोलीस दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. पब मॅनेजरवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

शहरामध्ये दिवसेंदिवस धारदार शस्त्राने वार करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. क्षुल्लक कारणांवरून डोक्यात राग धरून किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या कारणांवरून वाद होतात. ह्या झटापटीच्या वादामध्ये एकमेकांवर डायरेक्ट धारदार शस्त्राने वार केले जातात. मग यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःचा जीव देखील गमवावा लागतो. नवी मुंबई शहरांमध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या असून यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्यामुळे अनेक व्यक्ती जखमी झालेल्या देखील पाहायला मिळाले आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून वारंवार आव्हान केले जाते. तसेच प्रत्येक ठिकाणी गस्त घातले जातात. मात्र काही व्यक्ती या भाईगिरीच्या नादात किंवा डोक्यात राग शिरल्याच्या नादात अशा प्रकारचे अपकृत्य करतात. नवी मुंबईतील वाशी परिसरामध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. प्रेम प्रकरणाच्या वादातून ती घटना घडली होती. त्या घटनेमध्ये समोरील व्यक्ती ही पूर्णपणे जखमी झाली होती. त्याही वेळी नवी मुंबई पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले होते.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा शार्पशूटर दिपक रांगा अटकेत

नवी मुंबई शहरामध्ये अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्त पदी मिलिंद भारंबे आल्यापासून या घटनांना आळा बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरांमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेतील आरोपीला सध्या नवी मुंबई पोलीस ताबडतोब ताब्यात घेत असलेले पाहायला मिळतात. वाशीसारख्या घटनेमध्ये देखील नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते आणि एपीएमसीमधील पबमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये देखील पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची काम करण्याची पद्धत ही अगदीच चोख असल्यामुळे आरोपींना ताबडतोब बेड्या ठोकल्या जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबई शहरांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता दिसून येत असल्यामुळे नवी मुंबईच्या जनतेला सुटकेचा श्वास घेता येईल, अशी आशा नवी मुंबईकर व्यक्त करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here