नागपूर: वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने चार वर्षांच्या चिमुरड्याला सिगारेटने चटके दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चिमुकल्यांच्या आईसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आरोपीने हा प्रकार केला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे.
मी इथला भाई आहे, माझ्याकडे पैसे मागतो का? ग्राहकाची पब मॅनेजरवर दादगिरी; नंतर घडलं धक्कादायक कृत्य
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संकेत रमेशराव उत्तरवार (३८) याच्याविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडितेची आजी सरस्वती अशोक सेवाळे (५२) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एमडीसीच्या कंपनीत काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत आणि पीडित मुलाची आई लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यांना अभय (६) आणि आदित्य (२) ही दोन मुले आहेत. वर्षभरापूर्वी महिलेच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून ही महिला आपल्या मुलांसह सासरच्यांपासून दूर राहून हिंगणा एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होती.

यावेळी तिची भेट आरोपी संकेत उत्तरवार याच्याशी झाली. हळूहळू तिची आरोपीशी जवळीक वाढत गेली आणि काही काळानंतर दोघांचे प्रेम फुलू लागले. दोघे वाडीच्या परीसरात एकत्र राहू लागले. पीडित आणि त्याचा भाऊ आपली मुले नसल्याने संकेत हा नेहमी त्यांचा छळ करायला लागला. चिमुकल्याला सिगारेटचे चटके द्यायला लागला. ८ सप्टेंबरला तक्रारदार आजीचा नातेवाईक हा पीडित मुलाला भेटला. त्याच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर चटक्यांचे डाग नातेवाइकाला दिसले. त्याने तक्रारदार आजीला माहिती दिली.

हुकमी एक्का मैदानात उतरविण्याचा प्लॅन, शरद पवारांनी डाव टाकला, दादांवर बालेकिल्ल्यात कुरघोडी

आजीने पीडित नातवाची भेट घेत त्याला विचारणा केली. संकेतने चटके दिल्याचे सांगितले. तक्रारदार आजीने संकेतला विचारणा केली असता, ‘स्वत:चा मुलगा नसल्याने चटके दिले. मी कोणाला घाबरत नाही, जे करायचे ते कर’, अशी धमकी दिली. आजीने वाडी पोलिसात तक्रार दिली. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संकेतला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. अभ्यास करीत नसल्याचे मुलाला चटके दिल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here