रियाने घेतली बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींची नावं
एनसीबीच्या चौकशीच्या दुसर्या दिवशी रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा दावा केला आहे की तिने सुशांतसाठी अमली पदार्थ विकत घेतले होते. पण तिने कधीही त्याचा वापर केला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने चौकशीच्या दुसर्या दिवशी बॉलिवूडमधील काही बड्या लोकांची नावं घेतल्याचं समोर आलं आहे. सुमारे १८ ते १९ जणांची नावं रियाने घेतली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार लटकत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
१७ सप्टेंबर रोजी होणार वैद्यकीय मंडळाची बैठक
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात विसराचा तपास करणाऱ्या एम्स टीमची वैद्यकीय मंडळाची बैठक १७ सप्टेंबरला होणार आहे. या फॉरेन्सिक पॅनेलमध्ये एकूण सहा डॉक्टर असतील. हे पॅनेल प्रथमच अशा उपकरणांचा वापर करणार आहे ज्याचा वापर अमेरिकन एजन्सी एफबीय करते. या माध्यमातून फॉरेन्सिक टीम सुशांतला कोणता विषारी पदार्थ देण्यात आला की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
झैद, शौविक आणि मिरांडाची वैद्यकीय चाचणी
एनसीबीने सोमवारी झैद विलात्रा, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची वैद्यकीय चाचणी केली. वैद्यकीय चाचणीनंतर तिघांना पुन्हा एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. जोवर कोठडीत आहेत तोवर दर २४ तासांनी आरोपींची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times