याचिकाकर्त्या अनामिका जैस्वाल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, “अदानी समुहाच्या चौकशीत सेबीचे हितसंबंध गुंतले आहेत कारण सिरिल श्रॉफच्या मुलीचे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानींशी लग्न झाले आहे.” सिरिल श्रॉफ हे सिरिल अमरचंद मंगलदास या लॉ फर्मचे व्यवस्थापकीय भागीदार असून ते कॉर्पोरेट गव्हर्नन्सवरील सेबीच्या समितीचे सदस्य आहेत, जी इनसाइडर ट्रेडिंगसारख्या गुन्ह्यांशी संबंधित आहे असे याचिकाकर्त्यांपैकी एकाने सांगितले.
अदानी समूहाच्या शेअर्समधील कथित गैरव्यवहारात एका याचिकाकर्त्याने सेबीवर सर्वोच्च न्यायालयातील काही महत्त्वाची माहिती दडपल्याचा आणि DRI पत्रावर मौन पाळल्याचा आरोप केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्च अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सच्या कथित फेरफाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या, त्यानंतर सेबीला नियामक अटींचे पालन तपासण्यास सांगितले गेले होते.
त्याच वेळी, सेबीने सादर केलेल्या स्थिती अहवालाच्या उत्तरात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “सेबी फक्त या प्रकरणावर झोपून राहिले नाही, तर फक्त अदानींला फायदा होण्यासाठी अनेक दुरुस्त्या केल्या आहेत.” दरम्यान, या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होऊ शकते. सेबीने महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जानेवारी २०१४ चा इशारा लपवून ठेवला ज्यामध्ये अदानीने पैसे काढले आणि दुबई व मॉरिशस-स्थित संस्थांद्वारे अदानी-सूचीबद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, असा याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला.
अदानी-हिंडेनबर्गवर सेबीचा तपास अहवाल
दरम्यान, सेबीने सर्वोच्च न्यायालयासमोरील आपल्या स्थिती अहवालात म्हटले की, “२४ तपासांपैकी २२ तपासांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, तर दोन अंतरिम राहिले आहेत.” बोर्डाने सांगितले की ते दोन चालू तपासांशी संबंधित बाह्य एजन्सींच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत आहे. वकील एमएल शर्मा आणि विशाल तिवारी, काँग्रेस नेत्या जया ठाकूर आणि कायद्याची विद्यार्थिनी अनामिका जयस्वाल या याचिकाकर्त्यांच्या अदानी-हिंडेनबर्ग वादाशी संबंधित चार जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.