मुंबई : गेल्या वर्षभरात संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. अनेक संरक्षण शेअर्सने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. पण आता या शेअर्सवर आणखी दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी का? हा प्रश्न आहे. त्यामुळे Antique ब्रोकरेज फर्मने काही निवडक संरक्षण क्षेत्रातील शेअर्सबाबत माहिती घेऊ…

माझगाव डॉक्स (Mazagon Dock Shipbuilders)
कंपनीकडे प्रचंड वर्क ऑर्डर आहेत. या कारणास्तव, तज्ज्ञ या शेअरवर गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत. सध्याची कामगिरी इत्यादी लक्षात घेऊन ब्रोकरेजने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

हा शेअर खरेदी करणाऱ्यांना कुबेर पावला… 10 वर्षात करोड रुपयात दिला परतावा, पुढे अजून सुसाट पैसा
कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard)
गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमतीत १६० टक्क्यांनी वाढ झाली असून आता स्टॉक ११३२ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा विश्वास व्यक्त करत तज्ज्ञांनी या शेअरला बाय रेटिंग दिले आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
Antique ब्रोकरेजचा विश्वास आहे की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरची किंमत येत्या काळात ५१८० रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते. ब्रोकरेज फर्मने शेअरसाठी बाय रेटिंग दिले आहे. अलीकडेच अनेक करारांवर स्वाक्षरी केल्‍यामुळे एचएएल केवळ स्‍थानिक स्‍तरावर इंजिन तयार करण्‍यात यशस्वी झाले, ज्याचा परिणाम कंपनीच्या ताळेबंदावर दिसून येईल.

TATA समूहाच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी, गुंतवणुकदारांना मोठा फायदा होणार? कारण काय जाणून घ्या
भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL)
कंपनीकडे सध्या २० हजार कोटी रुपयांचे काम आहे. कंपनीला विश्वास आहे की २३ ते २६ या आर्थिक वर्षात कंपनी १५% CAGR साध्य करण्यात यशस्वी होईल. ब्रोकरेजने भारत इलेक्ट्रॉनिकचे शेअर्स १६१ रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात असे सांगत बाय रेटिंगही दिले आहे.

डिफेन्स कंपनीचा स्टॉक सुसाट पळतोय, शेअर बाजारात खरेदीची लाट; करा गुंतवणूक व्हा मालामाल!
भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics Limited)
काही क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमध्ये भारत डायनॅमिक्सचे मोठे योगदान आहे. आगामी काळात त्यांना कामाच्या ऑर्डर मिळत राहतील अशी आशा कंपनीला आहे. दीर्घ मुदतीत, कंपनीकडे पाइपलाइनमध्ये ५० हजार कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर असून कंपनीच्या महसुलात निर्यातीचा वाटा २५% आहे. अशा परिस्थितीत भारताला डायनॅमिक्स निर्यात वाढवायची आहे. ब्रोकरेजने १४३० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here