२०२३ च्या अर्थसंकल्पातच सरकारने आपली मर्यादा दुप्पट केली असून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेच्या मदतीने तुम्ही कमाई करू शकता. योजनेत एकल आणि संयुक्त (तीन व्यक्तींपर्यंत) दोन्ही खाती सुरू करण्याची मुभा देण्यात आली असून खात्याचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्ष आहे. सध्या १ एप्रिल २०२३ पासून MIS वर ७.४ टक्के व्याज दिले जात आहे.
काय आहे पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना एक सरकारी बचत योजना असून गुंतवणूकदारांमध्ये ही एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे. ही कमी जोखमीची बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना नियमित मासिक उत्पन्न मिळते. या योजनेत निश्चित व्याजाशिवाय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सिंगल (एकल) अकाउंट आणि जॉइंट खाती दोन्ही उघडता येतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात म्हणजेच पती-पत्नी एकत्र गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिस MIS खात्याची विशेष वैशिष्ट्ये
तुम्ही यामध्ये किमान एक हजार रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. तसेच तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
मासिक उत्पन्न इतके असेल
- तुम्ही ९ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,५०० रुपये मिळतील. तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ९,२५० रुपये मिळतील.
- पालक अल्पवयीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वतीने देखील खाते उघडू शकतात.
- खाते एका वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. मात्र, त्यानंतर त्यावर २% शुल्क वजा आकारले जाईल आणि तीन वर्षांनंतर बंद केल्यावर १ टक्के शुल्क कापले जाईल.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोण खाते उघडू शकते?
- एकच प्रौढ
- संयुक्त खाते: जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती खाते उघडू शकतात.
- अल्पवयीन/ दिव्यांग व्यक्तीच्या वतीने पालक
- त्याच्या स्वत:च्या नावावर १० वर्षांवरील अल्पवयीन.