कानपूर: एका चपातीवरुन सख्खा भाऊ वैरी झाला आणि त्याने आपल्या मोठ्या भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचं कारण ठरली एक चपाती. आरोपीने फक्त मोठ्या भावाची हत्याच केली नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहासोबत जे केलं ते कळाल्यानंतर लोकांना धक्काच बसला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

ही घटना कानपूरमधील बिल्हौर भागातील नानामाऊ गावात घडली. येथे एका घरात दोन भाऊ राहत होते. कल्लू आणि भुरा. यात कल्लू हा मोठा भाऊ होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. भुरा विवाहित आहे. रक्षाबंधनाला त्याची पत्नी माहेरी गेली होती. तेव्हापासून ती परतलीच नव्हती.

जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर…
तीच पती आणि भासऱ्यासाठी जेवण बनवायची. त्याच्या अनुपस्थितीत दोन्ही भाऊ जेवण बनवायचे. शनिवारी भुरा कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्याने आपल्या मोठ्या भावाला तो येईपर्यंत चपाती बनवायला सांगितलं होतं. पण, रात्री घरी परतल्यावर त्याला चपात्या बनवल्या नसल्याचं दिसलं. यावर तो संतापला. त्याने मोठ्या भावाला विचारले, ‘तू चपाती का बनवली नाहीस?’ त्यावर मोठा भाऊ म्हणाला, ‘तू बनव, मी बनवणार नाही’.

या लहानशा गोष्टीवरून दोन भावांमध्ये मोठं भांडण झाले. काही वेळातच भांडण वाढलं. दरम्यान, धाकट्याने घराबाहेर ठेवलेला दगड उचलून मोठ्या भावावर हल्ला केला. त्याने भावावर एकामागून एक दगड मारून त्याचा खून केला.

पृथ्वीसारखा दुसरा ग्रह सापडला? आपल्याच सूर्यमालेत आहे हा ग्रह, शास्त्रज्ञांचा दावा
भावाची हत्या करूनही तो थांबला नाही. त्यानंतर त्याने भावाचा मृतदेह दोरीने बांधून गावाबाहेर खेचून नेला. जवळच गंगा नदी आहे. त्याची बोट तिथेच होती. त्याने मृतदेह त्याच रात्री गंगेत फेकून दिला. मृतदेह घेऊन जात असताना रस्त्यात रक्त सांडलेलं होतं. सकाळी गावातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला पकडलं. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. डीसीपी विजय ढुल यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, चपाती बनवण्यावरून भावासोबत भांडण झाले होते. यामध्ये त्याने भावाची हत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here