नवी दिल्ली : लॉकडाउन १ आणि २ मध्ये तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आता तिकीटाचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. पुढील १५ दिवसांत रिफंड त्यांना मिळणार आहे. तशा प्रकारचे आदेश केंद्र सरकराने विमान कंपन्यांना दिले आहेत.

केंद्र सरकारच्या विमान तिकिटांवरील रिफंडच्या नव्या प्रस्तावाने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना यामुळे रिफंड मिळणार आहे. ज्या कंपनीला रिफंड शक्य नसेल त्यांनी प्रवाशांना ३१ मार्च २०२१ पर्यंत वैधतेचे क्रेडीट पॉईंट देण्याचे सरकारने निर्देश दिले आहेत. प्रवाशांना रिफंड द्यावा की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

२५ मार्च ते १४ एप्रिल या दरम्यान देशात पहिला लॉकडाउन होता. तर १५ एप्रिल ते ३ मे या दरम्यान दुसरा लॉकडाउन होता. या दरम्यान बुक केलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटांची पूर्ण रक्कम १५ दिवसांत प्रवाशांना देण्याचे निर्देश कंपन्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान ज्या कंपन्या पैसे परत करण्यास सक्षम नाहीत अशा कंपन्यांनी प्रवाशांना तिकिटाचे मूल्या इतके क्रेडीट पॉईंट द्यावे लागणार आहेत.त्याशिवाय क्रेडीट पॉइंटसाठी प्रवासाची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत द्यावी लागले. जर कंपन्यांनी क्रेडीट पॉईंट विलंबाने दिले तर त्यावर ०.५ ते ०.७५ टक्के नुकसान भरपाई प्रवाशांना द्यावी लागेल. क्रेडीट पॉईंट दुसऱ्याला हस्तांतर करता येतील, असेही न्यायालयाने म्हटलं आहे.

करोना आणि लॉकडाउनमुळे विमान कंपन्यांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. कंपन्यांची आर्थिक बाजू डबघाईला आल्याने प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करणे कंपन्यांसाठी अवघड बनले आहे. या स्थितीत प्रवासी आणि विमान कंपनी या दोघांचे हित जपणारा तोडगा आवश्यक आहे, असे मत एक वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.कंपन्यांनी अनलॉकमध्ये काही निवडक मार्गांवर विमान सेवा सुरु केली आहे. मात्र त्यात मर्यादित आसन क्षमता आहे. मागील तीन महिन्यात लॉकडाउनमध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी नोकर कपात, वेतन कपात आदी पर्यायांचा अवलंब केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here